लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे खडसेंच्या भाजपमधील अधिकृत प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. भाजपच्या अंतर्गत वाद विकोपाला गेल्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पक्षाने खडसेंना विधान परिषदेचे आमदार केले. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून खडसेंच्या स्वगृही परतण्याबाबत तर्क केले जात आहे. खडसेंनीच भाजपप्रवेशाची शक्यता व्यक्त केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse visits amit shah in delhi amy