Premium

“एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट लाचार, गुलामाला मालकाची भाषा…” संजय राऊत यांची घणाघाती टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाली आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

What Sanjay Raut Said?
संजय राऊत यांची शिंदे गटावर घणाघाती टीका

एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडून नाव आणि चिन्ह विकत घेतलं असलं तरीही त्या चिन्हावर आणि नावावर त्यांना मतं मिळणार नाहीत. जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना. भाजपाचं एक धोरण आहे वापरा आणि फेका ते त्यांनी सुरु केलं आहे. एकनाथ शिंदेंसह जे लोक गेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो. मोदी अमित शाह यांचे फोटो लावून निवडणूक लढा आणि जिंकून दाखवा असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान दिलं आहे. तसंच एकनाथ शिंदे गट लाचार असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले संजय राऊत?

मुंबई महापालिकेवर शिवसेना आणि भाजपा युतीचा झेंडा फडकणार असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत. कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेलो लोक लाचार आहेत. गुलामाला मालकाचीच भाषा बोलावी लागते. एकनाथ शिंदेंची मला कीव येते की ते कधीकाळी शिवसैनिक होते आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत होते. युतीमध्ये असतानापासून म्हणजे गेल्या ३० वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर आहे. मुंबई बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रात टिकवली. आता जे मिंधे आहेत ते म्हणत आहेत भाजपाचा महापौर म्हणजेच युतीचा. मुंबईत शिवसेनेचाच महापौर असला पाहिजे. पण मिंधेंच्या एकाही आमदार-खासदारात ही हिंमत, धमक नाही की ते अमित शाह किंवा नड्डांना सांगण्याची की भाजपाचा महापौर होणार नाही. भाजपाचा महापौर होणं म्हणजे शेठजींचा किंवा भांडवलदारांचा महापौर होणं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे त्या मानसिकेच्या लोकांचा महापौर. मुंबई महापालिका काबीज करण्याविरोधात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात सगळे एकवटलेच आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 14:50 IST
Next Story
“मोदी सरकारमध्ये हिंमत असेल, तर…”, असदुद्दीन ओवेसींचं खुलं आव्हान; म्हणाले, “२ हजार किलोमीटर…!”