India-pakistan Ceasefire Updates: ७ मे पासून सुरू झालेले ऑपरेशन सिंदूर आज अखेर थांबविण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी सामंजस्य करार केला असून आज सायंकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रविराम करण्यास सहमती दर्शवली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी याची माहिती दिली. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वी एक्सवर पोस्ट टाकून भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी घडवून आणण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केल्याचा दावा केला. भारत आणि पाकिस्तान शस्त्रविरामासाठी तयार झाल्याची घोषणाही त्यांनी केली. तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, “भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबविण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आजवर कोणतीही तडजोड न करता ठाम अशी भूमिका घेतलेली आहे आणि पुढेही घेत राहिल.”
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटले की, पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ शस्त्रविरामावर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत.
Special Briefing by Ministry of Defence on Operation Sindoor: संरक्षण मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत झालेल्या लष्करी संघर्षाची माहिती देण्यात आली.
शस्त्रविराम झाला असला तरी पाकिस्तानने यापुढे काही आगळीक झाल्यास त्याला भारतीय सैन्यदलाकडून सडेतोड उत्तर देण्यात येईल, असेही संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
India-Pakistan Ceasefire Live Updates in Marathi | भारत पाकिस्तान लाईव्ह अपडेट्स | ऑपरेशन सिंदूर लाईव्ह अपडेट्स
Asaduddin Owaisi: ‘पाकिस्तान भिकाऱ्यांचा देश’, असदुद्दीन ओवेसींनी उडवली खिल्ली; म्हणाले, “त्यांनी इस्लामचा वापर…”
India Pakistan News LIVE Updates: भारत सरकारकडून वृत्तवाहिन्यांना वार्तांकनाबाबत महत्त्वाचे आदेश
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्या ज्याप्रकारचे वार्तांकन करत आहेत. त्यानंतर भारत सरकारने आता महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नागरी सुरक्षेसाठी वाजविण्यात येणारा सायरन हा बातम्यांच्या बॅकग्राऊंडला वाजवू नये, असे निर्देश भारत सरकारने दिले आहेत. नागरी सुरक्षा कायदा, १९६८ च्या कायद्यानुसार हे निर्देश सर्व वृत्तवाहिन्यांना देण्यात आले आहेत.
PM Modi chairs high-level security meeting: वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक सुरू
परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद संपल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. पाकिस्तानकडून चिथावणी देण्यात येत असल्याचे विधान परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी केले होते. तसेच शुक्रवारी रात्रीपासून पाकिस्तानने नागरी भागांनाही लक्ष्य केल्यानंतर सदर महत्त्वाची बैठक संपन्न होत आहे.
A high level meeting was chaired by PM @narendramodi at 7, Lok Kalyan Marg. Those who attended the meeting included Defence Minister @rajnathsingh, NSA Ajit Doval, CDS General Anil Chauhan, armed forces chiefs and senior officials. pic.twitter.com/mECIeuREKz
— PMO India (@PMOIndia) May 10, 2025
Civil Defence Volunteers in Chandigarh Updates: प्रशासनाने स्वयंसेवकांसाठी तरुणांना आवाहन करताच चंदीगडमध्ये उसळली प्रचंड गर्दी
चंदीगडच्या स्थानिक प्रशासनाने नागरी स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी तरुणांना आवाहन केल्यानंतर आज चंदीगडच्या तिरंगा पार्कात इच्छुकांची मोठी गर्दी उसळली. एएनआय वृत्तसंस्थेने एक व्हिडीओ शेअर केला असून यात मोठ्या संख्येने अनेक लोक पुढे आल्याचे दिसत आहे. शुक्रवारी केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगडच्या उपायुक्तांनी तरुणांना नागरी संरक्षण नोंदणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते.
#WATCH | Huge lines seen in Chandigarh when local announcements were made for volunteers to aid in the assistance. pic.twitter.com/Q7YXWRg50J
— ANI (@ANI) May 10, 2025
Sharad Pawar: भारत-पाकिस्तान तणावावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “बोलायचं नाही, थेट…”
India Pakistan News LIVE Updates: दल सरोवरात अज्ञात वस्तू कोसळली; काश्मीर खोऱ्यात मोठा आवाज पसरला
पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात बेछूट गोळीबार आणि तोफगोळांचा मारा होत असतानाच आता श्रीनगरच्या प्रसिद्ध अशा दल सरोवरात एक अज्ञात वस्तू कोसळली आहे. यानंतर काश्मीर खोऱ्यात स्फोटाचा मोठा आवाज आला.
VIDEO | A missile-like object landed deep inside the Dal Lake — a major tourist attraction in Srinagar — after loud explosions rocked the city on Saturday morning, officials said.
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2025
Smoke bellowed from the surface of the lake when the object landed, the officials said.… pic.twitter.com/qC8a6vNKsr
China Reaction: भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना चीनकडून आली महत्त्वाची प्रतिक्रिया; चीनने केले आवाहन
India Pakistan News Live Updates: भारताचा दृष्टीकोन नेहमीच जबाबदार राहिला; एस. जयशंकर यांची अमेरिकेला माहिती
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाबाबत चर्चा केली. यावेळी जयशंकर यांनी सांगितले की, भारताने नेहमीच जबाबदार दृष्टीकोन ठेवून भूमिका मांडली आहे आणि यापुढेही मांडत राहिल.
Fact Check: हवाई दलाच्या महिला पायलटला पाकिस्तानमध्ये पकडल्याचा दावा खोटा; केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण
Operation Sindoor Updates : तणाव वाढणार? पाकिस्तानकडून सैन्य पुढे सरकवायला सुरुवात; शत्रू राष्ट्राचे मनसुबे उधळण्यास भारतीय लष्कर सज्ज!
India Pakistan News Live Updates: पंजाबच्या भटिंडावर हवाई हल्ला झाल्याचा अलर्ट
हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन भटिंडा येथे वाजत आहेत. सायरन वाजत असल्यामुळे सर्व नागरिकांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांनी सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असेही सांगण्यात येत आहे.
India-Pakistan News: पाकिस्तानचे अमानवी कृत्य; भारतातील रुग्णालये आणि शाळांवर केले हल्ले, सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती
भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील रहीम यार खान हा लष्करी तळ उध्वस्त केल्याची माहिती विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
News Alert ! India targeted Pakistan military assets in Rahim Yar Khan: Wing Commander Vyomika Singh.
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2025
India Pakistan News Live Updates: परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
– पाकिस्तानने भारताच्या २६ ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
– या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भाताने पाकिस्तानची रडार व्यवस्था आणि तांत्रिक तळ उध्वस्त केला.
– पाकिस्तानने काश्मीरमधील नागरी भाग, शाळा, आरोग्य व्यवस्थेला लक्ष्य केले.
– पाकिस्तानने त्यांचे सैन्य सीमेनजीक आणण्यास सुरुवात केली आहे.
– भारतीय लष्कराच्या हवाई तळाचे नुकसान झाल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा
पाकिस्तानकडून उधमपूर, पठाणकोट आणि भटिंडाचे हवाई तळ लक्ष्य; भारत सरकारने सांगितल्या पाकिस्तानच्या कुरापती!
India Pakistan News Live Updates: पाकिस्तानचा दावा खोटारडा; भारताच्या हवाई दलाचे तळ सुरक्षित, लष्कराकडून व्हिडीओ जाहीर
पाकिस्तानच्या हल्ल्यात भारतीय हवाई दलाच्या तळांना उध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत होता. मात्र या दाव्यातील हवा भारताने काढून टाकली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत हवाई तळ सुरक्षित असल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
#WATCH पाकिस्तानी दुष्प्रचार के दावों को खारिज करते हुए भारत ने भारतीय वायु सेना के ठिकानों की तस्वीरें दिखाईं जहां कोई क्षति नहीं पहुंची है। pic.twitter.com/SFCjBzNDAR
— ANI_HindiNews (@AHindinews) May 10, 2025
India Pakistan News Live Updates: पाकिस्तानकडून पश्चिम सीमेवर ड्रोन, क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानातून हल्ला; कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती
पाकिस्तानच्या लष्कराने भारताच्या पश्चिमेकडील सीमेवर ड्रोन, लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानांमधून हल्ले करण्यात आले आहेत. एकूण २६ ठिकाणांना पाकिस्तानने लक्ष्य केले. उधमपूर, भूज, पठाणकोट आणि भटिंडा येथील लष्करी तळांसह नागरी भागातील शाळा आणि रुग्णालयांना लक्ष्य केल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.
Col Sofiya Qureshi: “Pakistani Army continues attacks along the western border using drones, loitering munitions, long-range weapons, and fighter jets. Infiltration attempts were made via air at over 26 locations. Air bases in Udhampur, Bhuj, Pathankot, and Bathinda were… pic.twitter.com/hnqxjTQS5n
— All India Radio News (@airnewsalerts) May 10, 2025
India Pakistan News Live Updates: पंजाबच्या पठाणकोट येथे स्फोटाचा आवाज आल्याचा स्थानिकांचा दावा
पंजाबच्या पठाणकोट येथे लागोपाठ दोन स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. शुक्रवारी रात्रीपासून पंजाबच्या सीमाभागात ड्रोनचे हल्ले सुरू आहेत.
India Pakistan News Live Updates: ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाण बंद, बघा विमानतळांची संपूर्ण यादी
सुरक्षेच्या कारणास्तव ३२ विमानतळांवरील नागरी विमानांचे उड्डाण स्थगित करण्यात आले आहे. पाहा संपूर्ण यादी.
पाकिस्तानच्या सियालकोट येथील दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड बीएसएफ जम्मूने उध्वस्त केले आहे. बीएसएफने या संबंधीचे वृत्त दिले असून पीटीआयने या कारवाईचा एक व्हिडीओ जाहीर केला आहे. पाकिस्तानकडून बीएसएफच्या चौक्यांवर गोळीबार करण्यात येत होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
VIDEO | Terrorist launchpad destroyed at Looni in Pakistan's Sialkot in response to unprovoked firing by other side: BSF
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2025
(Source: BSF)
(Disclaimer: Deferred Visuals by unspecified time)#IndiaPakistan #IndianArmy pic.twitter.com/On6HGIdLn5
पाकिस्तानकडून हरियाणाच्या सिरसा आणि पंजाबमधील सीमाभागातील गावात ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. सिरसा येथील गावात ड्रोनचे अवशेष पडल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. हवाई दलाचे पथक आणि जिल्हा पोलीस घटनास्थळी तपास करत आहे.
https://twitter.com/SpokespersonMoD/status/1921047682849640892
India Pakistan News Live Updates: महाराष्ट्र सरकारचे मच्छिमारांना सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्देश
पालघर किनाऱ्यावरील मच्छिमारांना महाराष्ट्र सरकारने सुरक्षा निर्देश दिले आहेत. देशाची सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहण्यासही महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
India Pakistan News Live Updates: पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली नाराजी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज उपलब्ध झाले आहे. यानंतर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज दिले तर उपखंडातील सध्याचा तणाव कसा कमी होईल, असा प्रश्न ओमर अब्दुल्ला यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला विचारला आहे.
I’m not sure how the “International Community” thinks the current tension in the subcontinent will be de-escalated when the IMF essentially reimburses Pakistan for all the ordnance it is using to devastate Poonch, Rajouri, Uri, Tangdhar & so many other places.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 10, 2025
India Pakistan News Live Updates: परराष्ट्र मंत्रालय सकाळी १०.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार
भारत-पाकिस्तानमधील तणाव आणि पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तराबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून १०.३० वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.
MEA (Ministry of External Affairs) and MoD (Ministry of Defence) briefing to be held at 10:30 am today.
— ANI (@ANI) May 10, 2025
पुण्यातील तरुणीकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची इन्स्टावर कमेंट, पोलिसांनी केली अटक
India Pakistan News Live Updates: पाकिस्तानकडून सकाळी काय दावा करण्यात आला?
शनिवारी सकाळी पाकिस्तानने दावा केला की, भारताने पाकिस्तानच्या तीन हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. यापैकी एक हवाई तळ इस्लामाबादजवळचे आहे. पण त्यांच्या हवाई सुरक्षा प्रणालीने भारताचे हल्ले परतवून लावले, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
भारताकडून नूर खान बेस, मुरीद बेस आणि शोरकोट बेसवर लढाऊ विमानातून क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करण्यात आला, अशी माहिती पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दिल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.
India vs Pakistan Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडण्यात यश, भारताकडून प्रत्युत्तर
श्रीनगरवर पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडण्यात यश आले आहे. शुक्रवारी रात्री पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी आणि नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले करण्यात आले. त्याला भारताने प्रत्युत्तर दिले, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिली.
India vs Pakistan Operation Sindoor Live Updates: परराष्ट्र मंत्रालयाची शनिवारी सकाळी १० वाजता पत्रकार परिषद
शुक्रवारी रात्री पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवरील राज्यात रात्रभर हल्ले सुरू होते. तसेच या हल्ल्यांना भारतानेही प्रत्युत्तर दिले आहे. लष्करी कारवाईची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
India vs Pakistan Operation Sindoor Live Updates: अतिरिक्त जिल्हा आयुक्त, दोन नागरिकांचा पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यू
पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राज कुमार थापा शहीद झाले असून आणि दोन सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. राजौरीच्या डीसी कॉलनतील थापा यांच्या घरावर पाकिस्तानकडून फेकण्यात आलेला तोफगोळा पडून स्फोट झाला. त्यात राज कुमार थापा जखमी झाले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामाची घोषणा झाली आहे.