India Pakistan Tensions Updates उरी, कुपवाडा, तंगधारमध्ये दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे. भारत पाकिस्तानवर सीमेवर सध्या मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. होथियापूरमध्ये पाकिस्तानची मिसाईल पाडण्यात आली आहेत. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आला त्यात २६ पर्यटकांना ठार करण्यात आलं. त्या हल्ल्याचं उत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. मात्र यानंतर पाकिस्तानकडून होणारी आगळीक थांबलेली दिसत नाही. ज्यानंतर आता भारताने जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे. याच संदर्भातले लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊ ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Operation Sindoor Live Updates : पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला भारताचा ‘करारा जवाब’

07:37 (IST) 9 May 2025

मध्यरात्री सीमेवर नेमकं काय घडलं? पाकिस्तानची आगळीक, भारताचं प्रत्युत्तर आणि ब्लॅकआऊट!

Pakistan Drone Attack Update: गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून सीमाभागातील अनेक राज्यांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. …सविस्तर बातमी
07:24 (IST) 9 May 2025

पाकिस्तानचे ५० ड्रोन्स भारताने पाडले

भारताने गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानचे ५० ड्रोन्स निकामी केले आहेत. उधमपूर, संभा, जम्मू, अखनूर आणि पठाणकोट या ठिकाणी हे ड्रोन हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आणि हे ड्रोन हाणून पाडले.

07:11 (IST) 9 May 2025

देशाच्या सैन्य दलांवर आम्हाला गर्व आहे-लालूप्रसाद यादव

आम्हाला सगळ्यांना आपल्या देशाच्या सैन्यदलांवर गर्व आहे. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. जे घडतं आहे ते चांगलंच आहे. आम्ही आपल्या देशाच्या सैन्य दलांबरोबर आहोत. असं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यांनी म्हटलं आहे.

06:38 (IST) 9 May 2025

India vs Pakistan War Updates: “जर पाकिस्तान थांबलं नाही, तर आम्ही…”, भारतानं शेजाऱ्यांना ठणकावलं; मध्यरात्रीच्या घडामोडींनंतर दिला इशारा!

India Pakistan Firing: गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. …सविस्तर वाचा
06:17 (IST) 9 May 2025

Operation Sindoor: भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानला जबरदस्त झटका, पठाणकोटमध्ये पाडलं पाकिस्तानी विमान

Operation Sindoor Updates: हेडक्वार्टर इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. …सविस्तर वाचा
05:55 (IST) 9 May 2025

05:43 (IST) 9 May 2025

India Pakistan War Updates: “भारताला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही”, भारत-पाकिस्तान तणावावर अमेरिकेची भूमिका; जेडी व्हान्स म्हणाले, “आम्हाला अडकायचं नाही”

Operation Sindoor Updates: दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. या भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिले आहे. …सविस्तर बातमी
05:21 (IST) 9 May 2025

05:21 (IST) 9 May 2025

05:18 (IST) 9 May 2025

05:18 (IST) 9 May 2025

05:17 (IST) 9 May 2025

04:48 (IST) 9 May 2025

04:48 (IST) 9 May 2025

04:48 (IST) 9 May 2025

03:46 (IST) 9 May 2025

03:04 (IST) 9 May 2025

02:29 (IST) 9 May 2025

02:28 (IST) 9 May 2025

02:21 (IST) 9 May 2025

02:20 (IST) 9 May 2025

02:14 (IST) 9 May 2025

India Pakistan War: क्रिकेटपटू अंबाती रायुडूचं ट्वीट

भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीबाबत एक ट्विट केलं आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जातंय. ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाला? वाचा सविस्तर

02:08 (IST) 9 May 2025

Muslim Personal Law Board: “भारत व पाकिस्तानने चर्चा करावी, युद्ध हा पर्याय नव्हे”

भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गोष्टी युद्धापर्यंत जाऊ नयेत, अशी आशा ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने व्यक्त केली आहे. भारत व पाकिस्तान यांनी या परिस्थितीत चर्चा करून मार्ग काढला पाहिजे, युद्ध हे पर्याय ठरू शकत नाही, अशी भूमिका बोर्डाकडून मांडण्यात आली आहे.

02:01 (IST) 9 May 2025

01:20 (IST) 9 May 2025

India Pakistan War: ‘पाकिस्तान नकाशावरपण राहणार नाही’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहाल टीका; म्हणाले, ‘त्यांचे खायचे वांदे’

Eknath Shinde on India Pakistan War: गुरुवारी सायंकाळी पाकिस्तानच्या बाजूने जम्मूच्या सीमाभागात ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर भारतीय लष्कराने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानची लाज काढत त्यांच्यावर टीका केली. …वाचा सविस्तर
00:52 (IST) 9 May 2025

पाकिस्तानमध्ये अनेक भागांमध्ये ब्लॅक आऊट

भारताच्या प्रतिहल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक भागात ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. पाकव्याप्त काश्मीर पूर्ण अंधारात गेलं आहे. तसेच इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. 

00:41 (IST) 9 May 2025

लाहोरवर भारतीय वायुसेनेचा हल्ला

India Pakistan War News : भारताच्या वायुसेनेने लाहोरवर मोठा हल्ला केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतातील २७ विमानतळं बंद करण्यात आली आहेत.

00:37 (IST) 9 May 2025

…तर पाकिस्तान नकाशावरही उरणार नाही-एकनाथ शिंदे

पाकिस्तानमध्ये भारतावर हल्ला करण्याची हिंमत नाही. भारताच्या विरोधात जर पाकिस्तानने काहीही केलं तर भारताचं सैन्य पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देईल. पाकिस्तानने त्यांच्या लायकीत राहिलं पाहिजे जर त्यांनी अशाच कारवाया सुरु ठेवल्या तर जगाच्या नकाशावरुन पाकिस्तानचं अस्तित्व नाहिसं केलं जाईल. पाकिस्तान नकाशावरही उरणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

00:32 (IST) 9 May 2025

दिल्लीत हाय अलर्ट, इंडिया गेट परिसर करण्यात आला रिकामा

दिल्लीत हाय अलर्ट, इंडिया गेट परिसर करण्यात आला रिकामा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

00:26 (IST) 9 May 2025

पाकिस्तानची दोन ड्रोन्स भारताने पाडली

पाकिस्तानची दोन ड्रोन्स भारतीय लष्कराने पाडली. ड्रोन हल्ला परतवून लावला आहे. जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरजवळ हा ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे.

पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर

पाकिस्तानकडून आगळीक झाल्यास सहन करणार नाही एस. जयशंकर यांचा इशारा

पाकिस्तानकडून हल्ले सुरुच, भारताने ५० ड्रोन केले नेस्तनाबूत

जे.डी. व्हान्स यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल, अमेरिका भारताला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही.