Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानची चलबिचल झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच भारत सरकार या संदर्भात अनेक महत्वाच्या बैठका घेत आहे. यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानची चलबिचल वाढल्याचं पाहायला मिळत आहे. यातच भारत सरकार या संदर्भात अनेक महत्वाच्या बैठका घेत आहे. त्यामुळे दिल्लीत हालचाली वाढल्याचं दिसून येत आहे. रविवारी भारताच्या हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर भारताच्या नौदल प्रमुखांनी देखील भेट घेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात चर्चा केल्याचं सांगितलं जातं.
MHA has asked several states to conduct mock drills in for items for effective civil defence on 7th May: Government of India Sources
— ANI (@ANI) May 5, 2025
Following measures will be undertaken –
1.Operationalization of Air Raid Warning Sirens
2. Training of civilians, students, etc, on the civil…
दरम्यान, यानंतर आता आजही दिवसभर दिल्लीत बैठकांचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळाल. यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना ७ मे रोजी नागरी संरक्षणासाठी ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.
MHA has asked several states to conduct mock drills for effective civil defence on 7th May. The measures to be taken during the drill include operationalisation of Air Raid Warning Sirens, Training of civilians, students, etc, on the civil defence aspects to protect themselves in… pic.twitter.com/TDNd4KzPwB
— ANI (@ANI) May 5, 2025
केंद्रीय गृहमंत्रालयाने नेमकं काय निर्देश दिले?
भारतातील सर्व राज्यांना नागरी संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ७ मे रोजी ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये या दिवशी सर्व राज्यांत सायरन वाजले जातील. जेव्हा हल्ला होतो, तेव्हा सूचना देण्यासाठी सायरन वाजवले जातात. मात्र, सर्व राज्यातील सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे की नाही? किंवा सुरक्षा यंत्रणा तपासण्यासाठी या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सांगितली जात आहे.