Pakistan PM shehbaz sharif sidelined as PM Modi and putin walk past watch viral video : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी चीनमधील तियानजिन येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत सहभागी झाले. यावेळी मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली. दरम्यान या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेचे व्हायरल झाले असून त्यांनी जगभरातील देशांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापाराच्या मुद्द्यावर तणाव असताना ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

तियानजिन येथील समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये जगातील तीन बड्या शक्ती असलेल्या देशांच्या नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण गप्पा होताना पाहायला मिळले, तर याप्रसंगी इतर जागतिक नेते त्यांच्याकडे दूर उभे राहून पाहाताना दिसत आहे. अशाच एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्लेनरी सेशनच्या काही मिनीटे आधी पंतप्रधान नरेद्र मोदी हे पुतिन यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पा मारत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ हे मात्र उदास चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहाताना दिसून येत आहेत.

नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी यांच्याबरोबर काढलेले फोटो देखील पोस्ट केले आहेत. याबरोबरच त्यांनी या नेत्यांबरोबर झालेल्या मैत्रिपूर्ण संवादावर देखील प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “तियानजिनयेथे संवाद सुरूच आहेत! SCO शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष शी यांच्याबरोबर विचारांची देवाणघेवाण केली.”

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यात्यात तणाव वाढलेला आहे. ए्प्रिलमध्ये झालेल्या या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव वाढला. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवले आहे. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्यप्त काश्मीर येथील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.

भारताबरोबर लष्करी संघर्षा झाल्यानंतर पाकिस्तानने अमेरिकेशी जवळीक वाढवली आहे. इतकेच नाही तर पाकिस्तान शस्त्रविरामाचे श्रेय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देत ​​आहे. मात्र भारताने हा दावा सातत्याने फेटाळून लावला आहे.

SCO परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत. चीनच्या तियानजिन भागात या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेदरम्यान ज्या पुतिन यांच्याशी मैत्रीच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ आकारलं आहे, त्या पुतिन यांची मोदींनी गळाभेट घेतली. हे फोटोही आता व्हायरल होत आहेत. या भेटीआधी मोदींनी शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या बैठकीत द्विपक्षीय संबंधांबाबत सविस्तर चर्चा केली. यामध्ये गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील ताणले गेलेले संबंध पूर्ववत करण्याबाबत मुद्द्यांचा समावेश करण्यात आला.