Budget 2023 : पॅन कार्डबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा, म्हणाल्या… | PAN Card To Be Single Common Identifier For Financial Transactions, Says Nirmala Sitharaman At Budget 2023 | Loksatta

Budget 2023 : पॅन कार्डबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा, म्हणाल्या…

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यात पॅन कार्ड विषयीही एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

PAN Card To Be Single Common Identifier For Financial Transactions
जाणून घ्या निर्मला सीतारमण यांनी काय घोषणा केली आहे?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध घोषणा आज निर्मला सीतारमण यांनी केल्या. सामान्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प ठरला आहे. कारण टॅक्स स्लॅबमध्ये पहिल्यांदाच बदल करण्यात आला आहे. नव्या कर रचनेनुसार सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नसल्याचं निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं आहे. तर पॅनकार्डबाबत निर्मला सीतारमण यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

पॅनकार्डबाबत काय म्हटलं आहे निर्मला सीतारमण यांनी?

पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे. पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून संपूर्ण देशात मान्यता देण्यात आली आहे. बजेट २०२३ यांनी पॅनकार्डला नवीन ओळख दिली आहे. आता ओळखपत्र म्हणून पॅनकार्डचा वापर नागरिक करू शकता. सीतारमण यांनी यामुळे पॅनकार्डला नवीन ओळख दिली आहे.

आयकर विभागाकडून भारतात प्रत्येक व्यक्तीसाठी पॅनकार्ड जारी केलं जातं. पॅनच्या मदतीने कर भरणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळते. इन्कमटॅक्स, म्युचअल फंड यासाठीही पॅन कार्ड महत्त्वाचं असतं. पॅन कार्डचा वापर बँक व्यवहारांसाठीही केला जातो.

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आणखी काय म्हणाल्या निर्मला सीतारमण?

महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करतेय, असं सीतारमण म्हणाल्या. जागतिक मंदीचा परिणामाची भीती असताना, विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. करोनाची साथ आणि रशिया-.युक्रेन युद्धामुळे जागतिक मंदीच वातावरण असताना, भारतीय अर्थव्यवस्थेची योग्य दिशेने वाटचाल सुरु आहे. भविष्य उज्वल आहे असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

विश्लेषण: अर्थसंकल्पात सामान्य करदात्यांसाठी नेमकं काय? करपात्र उत्पन्नाची मर्यादा बदलली, पण त्याचा फायदा कुणाला होणार?

अर्थसंकल्पातील सप्तर्षी काय आहे?

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका असल्यामुळे पुर्ण अर्थसंकल्प सादर होणार नाही. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. यावेळी अर्थमंत्री देशाच्या विकासाठी सात प्राथमिकता सांगितल्या. या प्राथमिकतांना त्यांनी सप्तर्षी असे नाव दिले आहे.

१. समावेशक विकास
२. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे
३. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक
४. क्षमतांचा विकास करणे
५. हरित विकास
६. युवा शक्ती
७. आर्थिक क्षेत्र

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 13:54 IST
Next Story
Mukesh Ambani : गौतम अदाणींना मागे टाकत मुकेश अंबानी बनले जगातील सर्वात श्रीमंत भारतीय