संसेदत दोन तरुणांनी केलेल्या घुसखोरीमुळे देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणाशी निगडित असलेल्या सर्व सहा आरोपींची दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. रोज नवेनवे खुलासे होत आहेत. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ज्यावेळी सागर शर्मा आणि डी. मनोरंजन हे दोन तरूण लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उतरले तेव्हा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते. या प्रकरणावर आता त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना या घटनेमागे काय कारण असावे, याबद्दल त्यांनी भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> Parliament Intruders: खासदारांनी घुसखोरांना तुडवलं; पण तरुणांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे काय?

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “संसदेची सुरक्षा का भेदण्यात आली? याचा विचार करावा लागेल. देशात वाढलेली बेरोजगारी आणि महागाई ही कारणे या कृत्यामागे आहेत.” संसेदत घुसखोरी केल्यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती. मात्र राहुल गांधी अद्याप यावर काही बोलले नव्हते.

राहुल गांधी यांच्याप्रमाणेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, “संसदेत घुसखोरी करण्यात आली, हा गंभीर विषय आहे. आम्ही वारंवार बोलत आहोत की, या विषयावर गृहमंत्र्यांनी समोर येऊन भाष्य केले पाहीजे. पण गृहमंत्री समोर येऊन याबद्दल प्रतिक्रिया देत नाहीत. का झाले, कसे झाले, त्याचे कारणे काय आहेत? हे कुणीही सांगत नाहीत. टिव्हीवर ते तासनतास बोलत आहेत, पण लोकसभेत येऊन पाच मिनिटांची प्रतिक्रिया द्यायला त्यांना वेळ नाही. लोकशाहीच्यादृष्टीने ही चांगली बाब नाही. पण जे लोक लोकशाहीला मानतच नाही, त्यांच्याबाबत बोलणेही उपयोगाचे नाही.”

खरगे पुढे म्हणाले की, काँग्रेसचे नाव घेऊनच भाजपा मते मागतात. नेहरू, गांधींना शिवीगाळ करून मताचा जोगवा मागितला जातो. त्यांचे कामच आहे की, काँग्रेसला शिव्या द्या आमणि मत मागा.

हे ही वाचा >> “जीते या हारे…”, सागर शर्माची पोस्ट चर्चेत; सर्व घुसखोर ‘भगत सिंग फॅन क्लब’ पेजवरून संपर्कात

दरम्यान संसद घुसखोरी प्रकरणात आणखी एक माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात सागर शर्मा, डी. मनोरंजन, नीलम आझाद, अमोल शिंदे, विशाल शर्मा आणि ललित झा या सहा आरोपींना आधीच अटक करण्यात आली होती. आता आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी काही वेळापूर्वीच दिली.

आणखी वाचा >> लोकसभेत घुसखोरी करण्यासाठी प्लॅन ‘ए’ आणि प्लॅन ‘बी’ तयार होता; मुख्य आरोपीची धक्कादायक माहिची

१३ डिसेंबर रोजी लोकसभेचं कामकाज सुरू असताना लोकसभेच्या गॅलरीमध्ये बसलेल्या दोन युवकांनी मुख्य सभागृहात उडी मारली. जिथे खासदार बसतात, त्या ठिकाणी त्यांनी उड्या मारुन आपल्या बुटातून धुराच्या नळकांड्या काढल्या आणि घोषणाबाजी केली. या दोघांनाही खासदारांनी पकडलं आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. आतमध्ये ही घटना घडत असतानाच लोकसभेच्या नीलम आणि अमोल शिंदे या दोघांनीही धूर पसरवत घोषणाबाजी केली. या सगळ्या आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament security breach happened due to says rahul gandhi on parliament kvg