दिल्लीमध्ये आज (१५ मार्च २०२२ रोजी) पार पडलेल्या भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये सध्या तुफान चर्चेत असणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या भाजपा खासदार आणि नेत्यांना मोदींनी हा चित्रपट आवर्जून पाहण्याचा सल्ला दिलाय. यावेळी पंतप्रधानांनी या चित्रपटाचं कौतुकही केलं आहे.

नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधानांनी हा चित्रपट फार उत्तम असल्याचं सांगितलं. तसेच अशाप्रकारचे आणखी चित्रपट निर्माण केले पाहिजेत अशी इच्छाही पंतप्रधानांनी बोलून दाखवली. “द कश्मीर फाइल्स हा फार चांगला चित्रपट आहे. तुम्ही सर्वांनी तो पाहिला पाहिजे. असे चित्रपट आणखी बनले पाहिजेत. अशा चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे,” असं पंतप्रधानांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं.

नक्की वाचा >> Video: The Kashmir Files वरुन मोदींनी सुनावलं; म्हणाले, “ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी…”

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झालाय. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि हत्याकांडाच्या कथानकावर हा चित्रपट आधारीत आहे. १२ मार्च रोजी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, चित्रटाचे निर्माते अभिषेक यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळीही मोदींची चित्रपटाचं कौतुक केलं होतं आणि चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगली कमाई केलीय. सोशल नेटवर्किंगवर सध्या ‘द कश्मीर फाइल्स’वरुन चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहेत. अनेकांनी या चित्रपटाबद्दल सकारात्मक मतं व्यक्त केली आहेत. तर काहींनी या चित्रपटाच्या माध्यमातून दोन समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप केलेत. दोन्ही बाजूने या चित्रपटाबद्दल बोललं जात असतं तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई सुरु ठेवलीय हे सुद्धा विशेष आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi tells bjp mps the kashmir files is a good film everyone should watch it scsg