आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राजीनामा देण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. पंतप्रधान निवडणुकीपूर्वीच राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते. त्यामुळे माध्यमांमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने हा खुलासा केला.
पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. येत्या शुक्रवारी डॉ. सिंग नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. पंतप्रधानपदाच्या चालू कार्यकाळातील ही तिसरी पत्रकार परिषद असणार आहे. त्यामुळेच पंतप्रधान राजीनामा देणार का, या विषयावर चर्चा सुरू झाली होती.
डॉ. सिंग राजीनामा देऊन त्याजागी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी विराजमान केले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण कॉंग्रेस पक्षाने दिलेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2013 रोजी प्रकाशित
पंतप्रधान राजीनामा देण्याची शक्यता निराधार
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राजीनामा देण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 31-12-2013 at 11:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmo junks speculation says manmohan singh will complete his tenure