पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले आहेत. तसेच राहुल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कोणतेही कार्य करण्यास आपण तयार असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.
रशियातील जी-२० परिषद आटोपून विशेष विमानाने मायदेशी परतत असताना विमानात झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकांविषयी मनमोकळी उत्तरे दिली.‘पुढील निवडणुकीनंतर राहुल गांधी हेच काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे आदर्श उमेदवार असतील. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील कोणतेही पद स्वीकारण्याची माझी तयारी आहे,’ असे ते म्हणाले.
यूपीएला पुढील वर्षी पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली तर तृणमूलला पुन्हा यूपीएत घेणार का, या प्रश्नावरही पंतप्रधानांनी सकारात्मक उत्तर दिले. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू वा मित्र नसतो, असे ते म्हणाले.
मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावर २० सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi is an ideal choice for the pm post says manmohan singh