नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही फूट पडलेली नसून अजित पवार गटाने केलेला फुटीचा दावा पूर्णपणे काल्पनिक असल्याचा युक्तिवाद शरद पवार यांच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीमध्ये करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कथित फुटीवर शुक्रवारी दोन्ही गटांकडून प्राथमिक मुद्दे मांडण्यात आले. पुढील सुनावणी सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असून त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्याशिवाय पक्षामध्ये फूट पडल्याच्या कथित प्रकरणावर सुनावणी घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग कसा घेऊ शकतो, असा आक्षेपाचा मुद्दा त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवादादरम्यान मांडला.

हेही वाचा >>>Sikkim flood: सिक्कीममध्ये पूरबळी २२ वर, १०३ बेपत्ता; मृतांमध्ये लष्कराचे सात जवान

शरद पवार यांच्यावर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांचे वागणे लोकशाहीवादी नाही. ते पक्षात मनमानी करत आहेत. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होण्याआधीच प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड कशी झाली? जयंत पाटील यांची नियुक्ती पूर्णपणे बेकायदा आहे. त्यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही बेकायदा ठरते, असा युक्तिवाद अजित पवार यांच्या वतीने  नीरज कौल यांनी केला. अजित पवार गटाकडे आमदारांचे बहुमत असल्याने अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पक्षातील विधानसभेतील ४३ , विधान परिषदेतील ६ आमदार तसेच, लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी एक असे दोन खासदार अजित पवार गटात सामील झाले आहेत, अशी माहिती आयोगाला देण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar group argument that there is no division in ncp amy
First published on: 07-10-2023 at 02:49 IST