Did You Know Where was Coins Made In India These Four Signs Can Help You Identify Which City Made The currency coins | Loksatta

भारतातील कोणत्या शहरात बनलं आहे तुमच्या खिशातील नाणं? ‘या’ एका खुणेवरून ओळखा

तुमच्याकडे असणारा एखादा कॉईन हा नेमका कुठून आलाय? भारतातल्या कोणत्या शहरात या नाण्याची निर्मिती झाली? नेमका किती प्रवास करून ते नाणं तुमच्या हातात पडलंय हे जाणून घेण्याची एक सोपी ट्रिक

Did You Know Where was Coins Made In India These Four Signs Can Help You Identify Which City Made The currency coins
तुमचं नाणं कोणत्या शहरात बनलंय? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Where Are Coins Made In India: गूगल पे, फोन पे व ऑनलाईन बँकिंग आल्यापासून आपणही सुट्टे पैसे फार क्वचितच जवळ ठेवतो. अलीकडे अगदी भाजी वाल्यांपासून ते छोट्या मोठ्या दुकानांमध्ये सुद्धा ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जाते. पण कधी कधी नेटवर्कमुळे, सर्व्हरमुळे नेट पेमेंटला अडथळा येतो किंवा अगदी एक दोन रुपयांच्या व्यवहाराला गूगल पे वापरणं नकोसं वाटतं. अशावेळी आपण नेहमीच्या नाण्यांकडे वळतो, हो ना? मोठमोठ्या नोटांच्या जगात अजूनही नाण्यांची किंमत कमी झालेली नाही. साहजिकच कालानुरूप त्याचे मूल्य व रूप बदलले असले तरीही. तुम्हाला माहित आहे का की आता तुमच्याकडे असणारा एखादा कॉईन हा नेमका कुठून आलाय? भारतातल्या कोणत्या शहरात या नाण्याची निर्मिती झाली? नेमका किती प्रवास करून ते नाणं तुमच्या हातात पडलंय हे जाणून घेण्याची एक सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत.

तुम्हाला माहीतच असेल की नाणी बनवण्याच्या कारखान्याला टांकसाळ असे म्हणतात. भारतात सध्या ४ टांकसाळ आहेत जिथे नाणी तयार होतात. सरकारी आदेश व बाजारातील गरज वजा मागणी पाहता नाणी बनवली जातात. भारतात नोएडा, मुंबई, हैदराबाद व कोलकत्ता येथे टांकसाळ आहे. या प्रत्येक शहरात तयार होणाऱ्या नाण्याला स्वतःची वेगळी ओळख दिली जाते. या खुणेवरूनच आपण आपल्या खिशात असणारे नाणे नेमके कोणत्या शहरात तयार झालेले आहे हे ओळखू शकता.

नाण्यांवरील ‘या’ खुणा पाहिल्यात का?

प्रत्येक नाण्यावर वर्ष लिहिलेले असते त्याखाली तुम्हाला एक खूण दिसेल. ही खूणच प्रत्येक टांकसाळ व शहराची ओळख आहे.

  1. ज्या नाण्यावर वर्षाच्या खाली एक बिंदू असतो ते नाणे नोएडा येथील टांकसाळात बनलेले असते.
  2. ज्या नाण्याच्या खालील बाजूस डायमंड खूण असते ते मुंबई येथे तयार झालेले नाणे असते.
  3. ज्या नाण्याच्या खाली स्टार असतो ते हैदराबाद येथे तयार झालेले नाणे असते.
  4. जर आपल्याला नाण्यावर केवळ वर्ष दिसले आणि कोणतीच खूण नसेल तर हे कोलकात्याला तयार झालेले नाणे असते.

हे ही वाचा<< भारतातील ‘या’ २ ठिकाणी आहे शून्य गुरुत्वाकर्षण; महाराष्ट्रातील झिरो ग्रॅव्हिटी डोंगर माहित आहे का?

तुमच्याकडे असणारी नाणी नक्की कोणत्या शहरात तयार झाली आहेत? तपासून बघा.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 15:54 IST
Next Story
१८ वर्षाचा दिसण्यासाठी हा ४५ वर्षीय CEO वर्षाला खर्च करतो १६ कोटी! ‘हे’ रुटीन पाळून वय थांबवता येते का?