How To Vote Without Voter ID: १९ एप्रिल २०२४ पासून ते ४ जून २०२४ पर्यंत देशभरात लोकसभा निवडणुकांचा मोठा उत्सव असणार आहे. यंदाची निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. तुम्हीही यंदा मतदान करण्यासाठी पात्र असाल तर या उत्सवाचा भाग होण्यासाठी सज्ज व्हा. तुम्हाला माहीतच असेल की मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र म्हणजेच इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड (EPIC) आवश्यक असते. पण भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमच्याकडे तुमचे प्रत्यक्ष मतदार ओळखपत्र नसले तरीही तुम्ही मतदान करू शकता, ते कसं हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही मतदानासाठी साइन अप करण्यापूर्वी, तुम्ही खालील पात्रता निकष लक्षात घ्यायला हवे.

  • १ जानेवारी २०२४ पर्यंत तुमचे वय किमान १८ वर्षे हवे. तुम्ही वयाची ही अट पूर्ण केल्यास, तुम्ही मतदानासाठी नोंदणी करू शकता.
  • तुम्ही नोंदणी करता तेव्हा तुम्हाला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो द्यावा लागेल. फोटो सुद्धा नवा असावा.
  • तुमचे वय मतदान करण्यायोग्य आहे याची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्राप्रमाणे तुमच्या वयाचा पुरावा दाखवावा लागेल.
  • पत्त्याचा पुरावा देखील सादर करावा लागतो. तुमचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, APL/BPL कार्ड यासाठी वैध असते.
  • तुम्ही सामान्य मतदार असल्यास, तुम्हाला ऑनलाइन फॉर्म 6 भरावा लागेल. परदेशात राहणाऱ्यांसाठी, फॉर्म 6A आवश्यक असतो.
  • आपले नाव, जन्मतारीख आणि पत्ता अचूक भरल्यावर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • नोंदणीकृत मतदारांनी निवडणूक वेबसाइटवर नोंदणीची स्थिती तपासावी. तुम्हाला त्यांचे नाव यादीत आढळल्यास, तुम्ही मतदान करू शकता.

तुम्ही फॉर्म 6 भरून ऑफलाइन नोंदणी देखील करू शकता. हे विनामूल्य आहे आणि तुम्ही त्यासाठी निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा बूथ लेव्हल ऑफिसर यांच्याकडून अर्ज मिळवू शकता. तुम्ही तुमचा अर्ज, तुमच्या कागदपत्रांच्या प्रतींसह, निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी यांच्याकडे सबमिट करू शकता. शिवाय तुम्ही अर्ज पोस्टाने पाठवू शकता किंवा तुमच्या मतदान क्षेत्रातील बूथ लेव्हल ऑफिसरकडे सोपवू शकता.

मतदार ओळखपत्र नसल्यास मतदान कसे करावे:

भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसले तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता. तुमचे नाव अधिकृत मतदार यादीत असल्यास तुम्ही मतदान करण्यास पात्र आहात.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी, तुमचं नाव भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकृत मतदार यादीत असल्याची खात्री करा.

मतदार यादीत नाव येण्यासाठी, आपल्या राहत्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे (ERO) फॉर्म ६ भरून सबमिट करणे आवश्यक आहे.

तुमचे नाव मतदार यादीत आल्यानंतर, तुमच्याकडे प्रत्यक्ष मतदार ओळखपत्र नसले तरीही तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे. मतदान करताना नोंदणी करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to vote without voter id in this loksabha election 2024 what do you need to register your name in voting list as per city svs