Highest Stoppage Train of India: ट्रेनचा प्रवास हा भारतीयांसाठी जीव की प्राण आहे. आपल्याकडे अनेकांना विमानाविषयी कुतूहल, आकर्षण असूनही स्वस्तात मस्त व सुंदर प्रवास करायचं म्हटलं की, ट्रेनच डोळ्यासमोर येते. ना ट्रॅफिकची चिंता, ना एका जागीच अडकून राहण्याची काळजी यामुळेच ट्रेन सर्वात सोयीस्कर पर्याय ठरते. पण आज आपण एका ट्रेनविषयी जाणून घेणार आहोत जिला इतके थांबे आहेत की तुम्हाला यापेक्षा आपण ट्रॅफिकमधूनही लवकर पोहोचू शकतो असे वाटे. ही ट्रेन थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल १११ स्टेशनवर थांबते. त्यामुळे या ट्रेनचे बुकिंग करायचे असेल तर आधी दोन वेळा विचार करा. ही ट्रेन कोणती हे पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही ट्रेन पश्चिम बंगाल ते पंजाब असा प्रवास करते. हावडा- अमृतसर मेल एक्सप्रेस असे या ट्रेनचे नाव असून याचा प्रवास मार्ग पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, युपी व हरियाणा मधून जातो. हावडा येथून अमृतसर तब्बल २००५ किमी दूर आहे व हा प्रवास करण्यासाठी ट्रेनला तब्बल ३७ तास लागतात.

हावडा एक्सप्रेस वेळापत्रक

ही ट्रेन भारतातील सार्वधिक थांबे घेणारी ट्रेन म्हणून ओळखली जाते. हावडा स्टेशनवरून ही ट्रेन संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुटते व सलग तीन दिवस प्रवास करून सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी अमृतसरला पोहोचते. तर अमृतसर वरून वापसीसाठी संध्याकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी निघून तिसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी ही ट्रेन हावडा येथे पोहोचते.

हावडा एक्सप्रेसचे तिकीट दर

हावड़ा-अमृतसर मेलएक्सप्रेसचे तिकीट दर हे साधारणपणे ७३५ रुपये आहे. थर्ड एसीसाठी १९५० रुपये, सेकंड एसी साठी २८३५ रुपये तर फर्स्ट एसीसाठी ४८३५ रुपये इतके तिकीटदर आहेत. ही ट्रेन भारताच्या पूर्व पश्चिम बाजूंना जोडण्याचे काम करते.

हे ही वाचा<< भारतीय रेल्वेवर लिहिलेले ‘हे’ पाच अंक आहेत खूप कामाचे! नेमका अर्थ जाणून व्हाल थक्क

तुम्हाला या ट्रेनच्या थांब्याच्या यादीवरून ही सर्वात लांब पल्ल्याची गाडी आहे असं वाटत असेल पण आश्चर्य म्हणजे भारतातील सर्वात लांब प्रवास मार्ग असणारी ट्रेन विविएक एक्सप्रेस आहे. ही ट्रेन डिब्रूगढ़ ते कन्‍याकुमारी असा प्रवास करते. हा प्रवास ९ राज्यातून होत असून यात ४२३४ किमी अंतर पूर्ण केले जाते. तरीही या रेल्वेचे केवळ ५९ स्थानकात थांबे आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway train takes most halts more than hundred stops check ticket price and timetable check in before booking svs