IPL Cheer Leaders Salary & Selection: २००८ साली आयपीएल सुरु झालं तेव्हापासूनच या सामन्यांची तुफान चर्चा आहे. अनेकदा तर आयपीएलला इतके महत्त्व दिले जाते की जागतिक क्रिकेटच्या स्पर्धांपेक्षाही भारतातल्या स्पर्धेचं क्रेझ जास्त असतं. वर्ल्ड कप, आशिया कपच्या वेळी अनेक खेळाडूंनी तर याच गोष्टीवरून क्रिकेटर्सना सुनावले सुद्धा होते. आयपीएलची शान जितकी खेळाडूंमुळे वाढली तितकीच या स्पर्धेतील वेगवेगळे प्रयोग सुद्धा आकर्षणाचा मुद्दा ठरत आहेत. आयपीएलला ग्लॅमरची जोड देण्यासाठी २००८ पासूनच चीअर लीडर्सचे डान्स आयोजित केले जातात. हा मुद्दा जितका कौतुकाचा ठरला होता तितकीच यावर टीका सुद्धा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ पासून कोविड काळात आयपीएलला जरी ब्रेक दिला नसला तरी चीअर लीडर्स मात्र सामन्यातून बाहेर होत्या. यंदा कोविडची लाट काहीशी ओसरल्यावर पुन्हा एकदा सर्व संघांकडून चीअर लीडर्स मैदानात आल्या आहेत. पण तुम्हाला माहित आहे का या चर्चेतील चीअर लीडर्स नेमक्या आल्या कुठून, त्यांची निवड कशी होते आणि मुख्य प्रश्न त्यांना पगार किती मिळतो?

तर मंडळी आयपीएलच्या सामन्यातील बहुतांश चीअर लीडर्स या परदेशातून आलेल्या असतात. विशेषतः अमेरिका , इंग्लंड, साऊथ आफ्रिका या देशातील कलाकारांना यासाठी प्राधान्य दिले जाते. या चीअर लीडर्सची निवड बॉलिवूड कास्टिंग एजन्सीतर्फे होते. यासाठी त्यांना पद्धतशीर ऑडिशन व लेखी परीक्षा सुद्धा द्यावी लागते तसेच मुलाखतीसाठी एक वेगळा डान्स सादर करावा लागतो. यानंतर आयपीएलच्या संघांकडून त्यांना प्रशिक्षण दिले जाते व आणि मग निवड प्रक्रिया पूर्ण होते.

चीअर लीडर बनण्यासाठी पात्रता काय हवी? ( Who Can Become IPL Cheer Leader)

डान्स व मॉडेलिंग यायला हवं, तसेच पूर्ण सामन्यात स्टॅमिना राखून ठेवावा लागतो म्हणून शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे.

या चीअर लीडर्सनी अनेकदा बॉलिवूडसह भारतीय सिनेमांमध्ये काम केलेलं असतं ज्यामुळे त्यांना भारतीय नृत्यशैलीची जाण असते. याशिवाय एरोबिक्स, जिम्नॅस्टिक व पाश्चिमात्य डान्स प्रकारांची थोडीफार सवय असल्यास त्यांना निवडीत प्राधान्य दिले जाते .

चीअर लीडर्सचा पगार किती? (IPL Cheer Leaders Salary)

एका रिपोर्टनुसार, प्रत्येक संघाच्या मालकांकडून चीअर लीडर्सचा पगार व राहण्याची, खाण्याची सोय केली जाते. साधारण एका सामन्यासाठी त्यांनी १४ ते १७ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यातही जर टी मॅच त्यांचा संघ जिंकला तर बोनसही दिला जातो.

हे ही वाचा<< भारतीय रेल्वेची ‘ही’ ट्रेन १०, २० नव्हे तर तब्बल १११ स्टेशनवर थांबते; बुकिंग करण्याआधीच जाणून घ्या माहिती

दरम्यान, अनेकदा चीअर लीडर्स पगार वेळेवर मिळत नाही किंवा फाईव्ह स्टारमध्ये राहण्याची सोय करतो सांगून संघाकडून साध्या व अस्वच्छ हॉटेल रूम बुक केल्या जातात अशाही तक्रारी समोर आल्या आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 cheer leaders salaries for one match glamorous lifestyle parties if team wins get how much bonus money svs