एक सामान्य माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट भेटू शकतो? ‘या’ पद्धतीने तुम्हीही करू शकता संपर्क

How To Meet PM Narendra Modi: जर तुम्हाला मोदींना भेटायचे असेल किंवा त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर नेमकी काय प्रक्रिया व पर्याय आहेत हे आपण जाणून घेऊया…

PM Narendra Modi Meet Greet Common Man How To Contact Prime Minister Modi Number Social Media Msg Email PMO Address
… तर तुम्हीही मोदींशी थेट बोलू शकता! (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

How To Meet PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रुटीन पाहता आपल्याला ते भेटू शकतील का असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. भारतात कोट्यवधी अशी लोकं आहेत ज्यांना एकदा तरी मोदींना भेटावं अशी इच्छा असेल. काहींना तर फक्त इच्छाच नाही तर मोदींकडून एखाद्या गोष्टीसाठी मदतही हवी असू शकते. आता आपल्यापैकी अनेकांच्या अगदी वरपर्यंत ओळखी असतीलच असे नाही ना? पण तरीही जर तुम्हाला मोदींना भेटायचे असेल किंवा त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर नेमकी काय प्रक्रिया व पर्याय आहेत हे आपण जाणून घेऊया…

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या कार्यालयाला संपर्क करण्यासाठी आपण खालील क्रमांकावर कॉल करू शकता.

PMO ऑफिस: +91-11-23012312

जर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फॅक्सद्वारे संपर्क करू इच्छित असाल तर आपण +91-11-23019545, 23016857 हा क्रमांक वापरू शकता.

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक किंवा कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंटवरही संपर्क करू शकता. या अकाऊंटच्या लिंक खालीलप्रमाणे:

  1. फेसबुक: https://www.facebook.com/narendramodi
  2. ट्विटर: https://twitter.com/narendramodi
  3. इंस्टाग्राम : https://www.instagram.com/narendramodi
  4. YouTube: https://www.youtube.com/user/narendramodi
  5. PMO फेसबुक पेज: https://www.facebook.com/pmoindia
  6. PMO ट्विटर पेज : https://twitter.com/pmoindia
  7. PMO YouTube चॅनेल: https://www.youtube.com/pmoindia

पीएम मोदी यांच्यापर्यंत आपल्याला कोणती तक्रार पोहोचवायची असल्यास https://www.pmindia.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरील https://pmopg.gov.in/CitizenReforms/Registration/Index या पेजवर भेट द्या इथे आपण तक्रार लिखित स्वरूपात दाखल करू शकता तसेच तुमच्या तक्रारीवर काय कारवाई केली गेली याचा आढावा सुद्धा घेऊ शकता.

दरम्यान, अनेकजण पंतप्रधानांशी पत्राच्या माध्यमातून सुद्धा संपर्क करतात. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी नरेंद्र मोदी हे पत्रांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेल्या मुद्द्यांवर चर्चा करतात

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 13:35 IST
Next Story
इंधनाची टाकी पूर्णपणे भरल्यास होते मोठे नुकसान; शासनाने ‘या’ कारणांमुळे चालकांना टाकी फुल न करण्याचा दिला सल्ला
Exit mobile version