The Sun Sets For Only 40 Minutes In Norway It Is Called The Country Of Midnight Sun | Loksatta

‘या’ देशात फक्त ४० मिनिटांची रात्र असते; ठिकाणाचे नाव वाचून तुम्हीही थक्क व्हाल

या आश्चर्यकारक घटनेमुळे, या देशाला संपूर्ण जगभरात मिडनाईट सनचा देश म्हणूनही ओळखले जाते. येथे मे ते जुलै असे सुमारे ७६ दिवस सूर्य फक्त ४० मिनिटांसाठी मावळतो.

norway country viral fact
photo: AP

अशा अनेक अनोख्या घटना पृथ्वीवर घडतात, ज्याचा विचार करायला बसलो तर डोकं चक्रावून जाईल. येथे दिसणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला समजते तितकी सोपी नसते. तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. यामुळे जगभरात अनेक ठिकाणी दिवस आणि रात्र वेगवेगळ्या वेळी असतात. म्हणजे भारतात जेव्हा सकाळी ६.०० वाजले असतील, तेव्हा अमेरिकेत रात्र असेल. पण तुम्हाला माहित आहे का की जगात असा देखील एक देश आहे जिथे सूर्य फक्त ४० मिनिटांसाठी मावळतो. म्हणजेच या देशात रात्र ही फक्त ४० मिनिटांची असते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ४० मिनिटांनी म्हणजे रात्री दीडच्या सुमारास या देशात सूर्याची पहिली किरण येते. आज आम्ही तुम्हाला त्याच देशाबद्दल सांगणार आहोत.

‘हा’ कोणता देश आहे?

या देशाचे नाव नॉर्वे आहे. नॉर्वे हे जगाच्या नकाशावर युरोप खंडाच्या उत्तरेस वसलेले आहे. हा देश उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे जगातील अनेक भागांच्या तुलनेत येथे खूप थंडी असते. वास्तविक, नॉर्वे आर्क्टिक सर्कलमध्ये येतो, म्हणून ही विचित्र घटना येथे घडते. मात्र, वर्षभर ही घटना घडत नाही. फक्त अडीच महिनेच या देशात असे घडते. अडीच महिने नॉर्वेमध्ये रात्र फक्त ४० मिनिटे असते. येथे रात्री ठीक १२:४३ वाजता सूर्य मावळतो आणि त्यानंतर सूर्य ४० मिनिटांनी म्हणजे रात्री १:३० च्या सुमारास उगवतो.

( हे ही वाचा: भारतातील ‘या’ रहस्यमय दरीत गेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही; ठिकाणाचे नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क)

या देशाला मिडनाइट सन देखील म्हणतात

या आश्चर्यकारक घटनेमुळे, नॉर्वेला संपूर्ण जगभरात मिडनाईट सनचा देश म्हणूनही ओळखले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मे ते जुलैपर्यंत सुमारे ७६ दिवस नॉर्वेमध्ये फक्त ४० मिनिटांची रात्र असते. मात्र, इतके दिवस सूर्य उगवल्यानंतरही येथे फारशी उष्णता नसते. नॉर्वे उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ असल्यामुळे याठिकाणी खूप थंडी पडते. या देशात बर्फाने झाकलेले अनेक पर्वत आहेत आणि अनेक हिमनद्या आहेत ज्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. नॉर्वेची बहुतेक कमाई त्याच्या पर्यटनातून येते, म्हणूनच नॉर्वेची गणना जगातील काही श्रीमंत देशांमध्ये केली जाते.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 14:40 IST
Next Story
भारतातील कोणत्या लोकांना ‘टोल टॅक्स’ भरावा लागत नाही माहितेयं का? जाणून घ्या