Premium Tatkal Ticket Booking : भारतात रेल्वचे सर्वात मोठे जाळे आहे. लाखो प्रवासी दररोज या रेल्वेने प्रवास करतात. परंतु प्रवासासाठी ट्रेनचे तिकीट महत्वाचे असते, हे तिकीट अनेक प्रकारे बुक केले जाते. अनेकजण प्लॅटफॉर्मच्या तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट बुक करतात. तर अनेकजण वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करतात. लांबपल्ल्याच्या ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये प्रवाशांना तात्काळ तिकीट बुकिंगचे ऑप्शन असते. हे तात्काळ तिकीट रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी बुक करता येते. पण तात्काळ तिकीटप्रमाणे प्रीमियम तात्काळ बुकिंग या ऑप्शनमधूनही प्रवाशांना तिकीट बुक करण्याची सुविधा आहे. पण प्रीमियम तात्काळ तिकीट म्हणजे काय आणि त्याद्वारे तिकीट कधी बुक करता येते? तसेच यातून तिकीट बुक केल्यानंतर कन्फर्म सीट मिळते का? याशिवाय बुक केलेले तिकीट रद्द झाले, तर पैसे परत येतात की नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रीमियम तात्काळ तिकीट बुकिंग म्हणजे काय? (What Is Premium Tatkal Ticket Booking)

भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग व्यतिरिक्त आणखी एक कोटा सुरु केला आहे. जो अगदी तात्काळ तिकीट बुकिंगप्रमाणेच आहे. ज्याचे नाव प्रीमियम तात्काळ तिकीट असे आहे. प्रीमियम तात्काळ कोट्यातून प्रवाश्यांना तात्काळ कोट्यातून ज्याप्रकारे तिकीट बुक करतात तसेच बुकिंग करावे लागते. यातही तिकीट बुकिंग एक दिवस आधी सकाळी १० वाजता सुरू होते. यातील एसी क्लासच्या तिकिटसाठी सकाळी १० वाजल्यापासून बुकिंग सुरु होते, परंतु नॉन एसी क्लासच्या तिकीटासाठी सकाळी ११ वाजल्यापासून बुकिंग सुरु होते. यातील एक खास गोष्ट म्हणजे प्रीमियम तात्काळ तिकीटाची किंमत डायनॅमिक असते, म्हणजे या ट्रेनचे प्रवासी भाडे सतत बदलत असते. यामध्ये तात्काळ तिकीट बुकिंगपेक्षा जास्त तिकीट भाडे असू शकते.

ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ का असतो? भारतीय रेल्वेने सांगितलेल्या ‘या’ कारणाचा विचारही केला नसेल

प्रीमियम तात्काळ तिकीट हे तात्काळ तिकीटापेक्षा वेगळे का आहे? (Difference Between Tatkal Ticket and Premium Tatkal Ticket)

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तात्काळ तिकीट आणि प्रीमियम तात्काळ तिकीटमध्ये नेमका काय फरक आहे. यातील फरक म्हणजे, तात्काळ तिकीटांच्या किंमत स्थिर असते, ज्यात किलोमीटर किंवा क्लासच्या आधारावर एक निश्चित रक्कम दिलेली असते. पण प्रीमियम तात्काळ तिकीट कॅटेगरीमध्ये तिकीटांचे दर स्थिर नसतात. या तिकीटाचे प्रवासी भाडे सतत बदलते. ज्यावेळी प्रीमियम तात्काळ तिकीटांची मागणी जास्त असेल त्यावेळी तिकीटांचे दरही खूप जास्त असतील. हे दर तात्काळ तिकीटांपेक्षा जास्त असतात. प्रवाशांना हे तिकीट फक्त आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइटवरूनच बुक करता येते. परंतु तात्काळ तिकीट प्रवासी आयआरसीटीसी व्यतिरिक्त इतर अनेक वेबसाइटवरून बुक करु शकतात.

प्रीमियम तात्काळ तिकीट विंडो तात्काळ तिकीट विंडोप्रमाणे कायम ओपन असते. यामध्ये यूजर्सना तिकीट बुक करण्यासाठी वेळ मिळतो. ज्याप्रमाणे तत्काळ तिकिटे पटकन विकली जातात, पण प्रीमियम तत्काळमध्ये तिकिटे विकायला थोडा वेळ लागतो आणि काही काळानंतर तिकिटे विकली जातात. याचे बुकिंग करण्याचे नियम तत्काळ सारखेच आहेत आणि ते फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच बुक केले जाऊ शकतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is difference between tatkal ticket and premium tatkal ticket booking get confirmed seats with this facility by irctc sjr
First published on: 29-03-2023 at 16:28 IST