Indian Railway Interesting Facts: रेल्वे हा भारतीयांच्या सर्वात जवळचा व आपुलकीचा विषय आहे. पण या रेल्वेविषयी अनेक अशा गोष्टी आहेत ज्या कदाचित आपल्यालाही ठाऊक नसतील . जसे की अलीकडेच भारतीय रेल्वेने आपल्या ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागील बाजूस ‘X’ अक्षर का असते यामागील कारण उघड केले आहे. रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर माहिती शेअर करून स्पष्ट केले की, पांढरे आणि पिवळे ‘X’ चिन्ह सूचित करते की ट्रेन कोणतेही डबे मागे न ठेवता पुढे गेली आहे. शेवटच्या डब्यावर ‘X’ अक्षर हे प्रवाशांसहित रेल्वे अधिकार्‍यांना पुष्टी देते की ट्रेन पूर्णतः निघून गेली आहे व कोणतेही डबे वेगळे किंवा मागे राहिलेले नाहीत.

जर ट्रेनवर ‘X’ खूण नसेल तर…

दुसरीकडे, जर एखादी ट्रेन एखाद्या स्टेशनवरून जात असेल आणि शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्ह नसेल, तर स्टेशन मास्टरने असे गृहीत धरले पाहिजे की ट्रेनला आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे व ट्रेन शेवटच्या डब्याशिवाय पुढे जात आहे. ही माहिती अधिका-यांसाठी ट्रेनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि तिची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO
a young man broke traffic rules while making reels
VIDEO : रील बनवण्याच्या नादात पठ्ठ्याने तोडले वाहतूक नियम, दिल्ली पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

ट्रेनच्या डब्ब्यावरील ‘LV’ अक्षराचा अर्थ काय?

याव्यतिरिक्त, जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केले तर तुम्हाला भारतीय रेल्वे ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्हासह लिहिलेली ‘LV’ अक्षरे देखील आढळतील. ‘LV’ म्हणजे लास्ट व्हेईकल आणि गेटमन, सिग्नलमन आणि केबिन कर्मचार्‍यांसाठी चेकपॉईंट म्हणून काम करते. हे सुनिश्चित करते की ट्रेन संपूर्ण प्रवास करत आहे, कोणतेही डबे चुकून जोडलेले नाहीत आणि मागे सोडले नाहीत, ज्यामुळे पुढील ट्रेनला अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

हे ही वाचा<< घरातील LED बल्बमुळे महिन्याच्या वीज बिलामध्ये किती खर्च येतो माहितेय का? पाहा सोपी आकडेवारी

दरम्यान, भारतीय रेल्वेच्या मते, ‘X’ चिन्हाचा वापर कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या ट्रेन किंवा मार्गापुरता मर्यादित नाही. ही सर्व ट्रेन्समध्ये एक कॉमन पद्धत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ही डिझाईन वापरली जाते. लोकल ट्रेनमध्ये दोन्ही बाजूला ड्रायव्हर केबिन असल्याने तिथे अशी कोणतीही खूण नसते.