Indian Railways Facts: भारतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवासासाठी सर्वाधिक रेल्वेचा वापर होतो. रेल्वे हे केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतेक देशांमध्ये कनेक्टिव्हिटीचे सर्वोत्तम साधन आहे. एका दिवसात लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केलाच असेल. अनेकांचे आयुष्य रेल्वेशी निगडीत आहे. याद्वारे लोकं एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि संपूर्ण देशात प्रवास करू शकतात. सहसा प्रत्येक शहरात एक रेल्वे स्थानक असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करतो तेव्हा रेल्वेच्या एका स्थानकावर उतरतो, त्या स्थानकाला एक ठराविक नाव दिलेलं असतं, ज्यामुळे आपल्याला त्या स्थानकाची ओळख पटवताना मदत मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का की, महाराष्ट्रात एक असं ठिकाण आहे. जेथे एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्थानके आहेत आणि ज्याला वेगळी नावं देखील दिली आहेत. याच कारणामुळे अनेकदा येथे प्रवासांचा देखील गोंधळ उडतो की त्यांची गाडी नेमकी कोणत्या स्थानकातून सुटणार आहे. आज आम्ही तुम्हाला ही स्थानके नेमके कुठे आहेत, याविषयी माहिती देणार आहोत.

(हे ही वाचा : भारतातील कोणत्या २ रेल्वे स्थानकांना नावं नाहीत माहितीये? वाचून तुम्हीही थक्क व्हाल )

महाराष्ट्रातील ‘या’ एकाच ठिकाणी दोन रेल्वेस्थानकं

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर आणि बेलापूर स्थानके एकाच ठिकाणी असून ते ट्रॅकच्या विरुद्ध बाजूस आहेत. अनेकदा जेव्हा आपण स्टेशनवर जातो तेव्हा सर्व प्लॅटफॉर्म आणि स्थानकांचे नाव एकच असते, परंतु महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये अनेकदा लोक गोंधळून जातात. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील हे स्टेशन खूप प्रसिद्ध आहे. येथे तिकीट खरेदी करण्यापूर्वी कोणत्याही प्रवाशाला ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे कारण, श्रीरामपूर आणि बेलापूर स्थानके एकाच ठिकाणी आहेत. फरक एवढाच आहे की ही दोन्ही स्थानके ट्रॅकच्या विरुद्ध बाजूस आहेत. बेलापूर आणि श्रीरामपूर शहरापासून ५ किमी अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. हे औरंगाबाद, शिर्डी आणि अहमदनगर या रेल्वे स्टेशनशी जोडले गेले आहेत.

दोन राज्यांच्या सीमेवर बांधलेले देशातील अनोखे रेल्वे स्थानक

भारतात एक अनोखे रेल्वे स्टेशन देखील आहे जिथे दोन राज्यांच्या सीमा जोडल्या जातात. निम्मे स्टेशन गुजरातमध्ये आणि अर्धे महाराष्ट्रात आहे. नवापूर रेल्वे स्टेशन गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. दोन राज्यांमध्ये विभागलेल्या या अनोख्या नवापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांना चार वेगवेगळ्या भाषांमध्ये माहिती दिली जाते. येथे हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठीमध्ये घोषणा दिल्या जातात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which state in india has two different railway stations just on the opposite side of the same track pdb