Premium

“घरी बसलेल्या नेत्यांना मतदार आता कायमचं…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका

CM Eknath Shinde Reaction : महाराष्ट्रातील इंडिया आघाडीत असलेले काही नेते ‘बेगानी शादी में, अब्दुला दिवाना’ अशा पद्धतीने वागत होते. या घरी बसलेल्या नेत्यांना जनता कायमची घरी बसवेल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Lok Sabha and Vidhan Sabha elections will be contested together
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (संग्रहित फोटो)

Assembly Elections Result 2023 : देशातील चार राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात भाजपाने मुसंडी मारली आहे. तसेच बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यानंतर भाजपाकडून देशभर जल्लोष साजरा होत आहे. त्यातच एनडीएमधील घटक पक्षही आनंद व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, देशासाठी भाजपाने केलेले काम व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नियोजन यामुळे भाजपाप्रणीत एनडीएला तीन राज्यांत घवघवीत यश मिळाले आहे. आतापर्यंत ‘घर घर मोदी’, असे म्हटले जात होते, पण यापुढे ‘मन मन मे मोदी’, अशी घोषणा द्यावी लागेल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> “मर्द कोण हे कळलं का?” भाजपाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न; राहुल गांधींवर टीका करत म्हणाले, “पनवती…”

“पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींवर बरीच टीका केली गेली. पण आता सत्य समोर आले आहे. जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला. तीन राज्यात बहुमताने एनडीएला विजय मिळाला आहे. इंडिया आघाडी द्वेष, मत्सराने भरलेली आहे. मोदींवर नको नको ते आरोप लावले तरी जनतेने मतपेटीतून इंडिया आघाडीला उत्तर दिले”, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “परदेशात जाऊन ‘भारत तोडो’ची भाषा राहुल गांधी वापरत होते. लोकांनी त्यांना धडा शिकवला असून त्यांची जागा दाखवून दिली. राजस्थानमध्ये राहुल गांधी यांनी मागच्या निवडणुकीत जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केली नाहीत. दहा दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन देऊन ते पूर्ण केलेले नाही, असे मला तिथले शेतकरी प्रचारादरम्यान सांगत होते. त्याचप्रकारे कर्नाटकातही काँग्रेसने मोठमोठी आश्वासने सत्ता तर मिळवली, पण ती पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नसल्याचे आता ते सांगत आहेत.”

पाच राज्याच्या निवडणुकांना इंडिया आघाडी उपांत्य फेरी असल्याचे म्हणत होते. पण आता हीच लोकसभेची अंतिम फेरी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल अगदी स्पष्ट आहे. २०२४ ला इंडिया आघाडीचे पानीपत होईल आणि आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडून पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा सत्तेवर आरूढ होतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे वाचा >> “सनातन धर्माने काँग्रेसला बुडवले”, पक्षातील ज्येष्ठ नेत्यानं दिला घरचा आहेर; म्हणाले, “लवकरच एमआयएम..”

महाराष्ट्रातही विरोधी पक्षाचे लोक एकत्र येऊन महायुतीला पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “बेगानी शादी मे, अब्दुला दिवाना” अशी विरोधकांची अवस्था आहे. महायुतीचे लोक एकत्र असून केंद्र आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार आणणारच. घरी बसलेल्या लोकांना जनता मतदान देत नाही, लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्यांनाच मत दिले जाते. त्यामुळे घरी बसलेल्या लोकांना कायम घरीच बसवले जाईल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde reaction on five state assembly election result 2023 slams india opposition kvg

First published on: 03-12-2023 at 14:34 IST
Next Story
मध्य प्रदेशमध्ये भाजपाचा बोलबाला, शिवराजसिंह चौहान यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार का?