Priyanka Gandhi Vadra Net Worth : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा या वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवत आहेत. बुधवार २३ ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेवर १३ नोव्हेंबररोजी मतदान होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका गांधी वाड्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यात त्यांनी त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे एकूण १२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यापैकी ४.२४ कोटी जंगम, तर ७.७४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. प्रियांका गांधी यांनी काही दिवसांपूर्वीरच १.०९ कोटी रुपयांची जागा खरेदी केली. तसेच या जागेवरील बांधकामासाठी ५.०५ कोटी रुपये खर्च केले. याशिवाय २.१० कोटी रुपये त्यांना वारसा हक्काने मिळाले आहेत. प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर १५.७५ लाख रुपयांचे कर्जही आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रियांका गांधी यांचे वर्षिक उत्पन्न ४६.३९ कोटी रुपये होते. याशिवाय ३० सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्याकडे एकूम ५२ हजार रुपये नगद होती.

हेही वाचा – Priyanka Gandhi : ‘मी ३५ वर्षे दुसऱ्यांसाठी मतं मागितली, पण पहिल्यांदाच स्वत:साठी…’, प्रियंका गांधींचं वायनाडकरांना भावनिक आवाहन

शेअर बाजार आणि इतर क्षेत्रातील गुंतवणूक

प्रियंका गांधी यांच्याकडे २.२४ कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड आहेत. ज्यात फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप-ग्रोथच्या १३ हजार २०० युनिट्सचा समावेश आहे. तसेच त्यांच्या पीपीएफ खात्यात १७.३८ लाख रुपये, तर बँक खात्यात ३.६० लाख रुपये आहेत. प्रियांका गांधी यांच्याकडे शेअर्स नाहीत, पण त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे उषा मार्टिन, इन्फोसिस, टाटा पॉवर, एनआयआयटी आणि रेल विकास निगम यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स आहेत.

कार, ​​सोने, चांदी आणि जमीन

प्रियंका गांधी यांच्याकडे ८ लाख रुपयांची होंडा सीआरव्ही ही गाडी आहे. ही गाडी त्यांना त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी भेट दिली आहे. याशिवाय त्यांच्याकडे १.१५ कोटी रुपयांचे सोने आणि २९ लाख रुपयांची चांदी आहे. प्रियांका यांच्याकडे दिल्लीतील सुलतानपूर मेहरौली गावात एक शेतजमीन आहे. या शेतजमीनीची किंमत २.१० कोटी रुपये आहे. यात भाऊ राहुल गांधी यांचाही हिस्सा आहे. याशिवाय प्रियांका यांचे हिमाचल प्रदेशातील शिमला येथे ५.६३ कोटी रुपयांचे घर आहे.

हेही वाचा – Navya Haridas: प्रियांका गांधींना वायनाडमध्ये तगडं आव्हान; RSS ची पार्श्वभूमी असलेली नव्या हरिदास केरळमध्ये कमळ फुलविणार?

रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे किती पैसे आहेत?

रॉबर्ट वाड्रा यांची एकूण संपत्ती ६५.५ कोटी रुपये आहे. ज्यामध्ये ३७.९ कोटी रुपयांची जंगम, तर २७.६४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. रॉबर्ट वाड्रा यांना भाडे, व्यवसाय, व्याज, गुंतवणूक आणि इतर काही स्रोतांमधून उत्पन्न मिळते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi vadra net worth wayanad bypoll congress candidate know in details spb