आज प्रेक्षकांचा ओढा चित्रपटगृहाकडे न वळता तो ओटीटी माध्यमाकडे वळला आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. करोना महामारीत ओटीटी प्लॅटफॉर्मकडे प्रेक्षकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार ओटीटीकडे वळले आहेत. याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज जगभरातला कन्टेन्ट बघता येतो. जे मोठ्या पडद्यावर दाखवता येत नाही किंवा बंधन लादली जातात ते या ओटीटी पर्यायात कोणतेच बंधन लागत नाही. काहींच्या मते हे अभिव्यक्त होण्याचे चांगले माध्यम आहे तर कांहींनीं हा प्लॅटफॉर्म फक्त शिवीगाळ, अश्लील दृश्य दाखवण्याकरता वापरला जात आहे अशी त्यांचीओरड आहे.

बिहार न्यायालयाने निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केले. तिच्या XXX या वेबसीरिज सीझन २ मध्ये भारतीय सैन्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा अपमान केल्याबद्दल हे अटक वॉरंट काढण्यात आले आहे. ओटीटी माध्यमाच्या नियमांबाबत जाणून घेऊयात.

विश्लेषण: 5G सेवेमुळे नेमका काय बदल होणार आहे? सिमकार्ड, मोबाईल, दर..जाणून घ्या सविस्तर!

ओटीटी माध्यमांवर कोणते नियम?

ज्याप्रमाणे चित्रपटांच्या बाबतीत सेन्सर बोर्ड काम करते त्याच धर्तीवर ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कोणतेही बोर्ड अस्तित्वात नाही जे ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणाऱ्या कंटेंटवर लक्ष ठेवेल. २०१९ साली स्ट्रीमिंग सेवा ज्यांच्यामार्फत प्रदर्शित केली जाते ते सर्विस प्रोव्हायडर. ज्यांनी एक नियमावली तयार केली आहे. ज्यामध्ये खालील दृश्ये, कंटेंट दाखवण्यास बंदी आहे.

  • राष्ट्रीय चिन्ह किंवा राष्ट्रध्वजाचा जाणीवपूर्वक किंवा द्वेषाने त्याचा अपमान करणे अशी दृश्य दाखवण्यास मनाई आहे.
  • कोणतेही दृश्य अथवा कथा ही चाईल्ड पॉर्नग्राफीला प्रोत्सहन देईल अशा गोष्टीवर बंदी आहे.
  • जाणूनबुजून आणि द्वेषाच्या भावनेने दहशतवादाला प्रोत्साहन देणारी कथा अथवा दृश्यांवर बंदी आहे.
  • एखादी कथा, विषय ज्यावर कोर्टाने बंदी घातली आहे. किंवा कायदाच्या विरोधातील आहे.

एकता कपूर शोभा कपूर अडचणीत का आल्या?

आज डिजिटल माध्यमांवर एखादी वेबसीरिज प्रदर्शित होताना ती सर्वसामान्य जनतेसाठी असते. ज्यात चित्रपटांसारखे प्रमाणपत्र नसते. चित्रपटांमध्ये १८ वर्ष पूर्ण असलेलय व्यक्तींना प्रौढांसाठीचे चित्रपट बघता येतात. एकता कपूरची वेबसिरीज XXX मध्ये लैंगिक संबंधांचे विविध पैलू दाखवले गेले आहेत.

या प्रकरणाची सुरवात कशी झाली?

एकता कपूरच्या XXX या वेबसीरिजच्या विरोधात माजी सैनिक शंभू कुमार यांनी ६ जून २०२० रोजी न्यायालयात तक्रार पत्र दाखल केले होते. एकता कपूरच्या या वेबसीरिजमध्ये भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच राष्ट्र चिन्ह आणि हिंदू देवतांचा अनादरदेखील करण्यात आला असेही त्यांनी नमूद केले होते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील एका न्यायालयात आई-मुलीच्या दोघांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

विश्लेषण : काय आहे दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटात दाखवलेल्या चोल साम्राज्याचा इतिहास? जाणून घ्या

या प्रकरणाची सांगता होणार का?

हे प्रकरण कोर्टात गेल्याने यावर काही काळ केस चालू शकते. एकता कपूर यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिली नाही. मात्र जोवर ज्याप्रमाणे चित्रपटांच्या बाबतीत सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आहे त्याचपद्धतीचे बोर्ड हे या माध्यमासाठी व्हायला हवे.