राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पाठोपाठ कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी ( १० सप्टेंबर) सभा होणार आहे.  यासाठी अजितदादा गटांने जय्यत तयारी सुरू केली आहे. या सभेला पन्नास हजार लोक उपस्थित राहतील असे दोन दिवसांपूर्वी सांगितले जात असताना आता या सभेला एक लाखाहून अधिक उपस्थिती जमवण्याचा संकल्प असल्याचा दावा संयोजकांनी बुधवारी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोल्हापूर : रक्षाबंधनदिनी चिमुकल्या भावाचा मृत्यू

अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सत्कार आणि उत्तरदायित्व सभा येथील तपोवन मैदान येथे होणार आहे.  ही सभा शरद पवार यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी नाही तर सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे, असे सभेचे संयोजक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले होते. त्या दृष्टीने सभेची तयारी सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> कोल्हापुरात अंबाबाई देवीचे दर्शन गाभाऱ्यातून सुरू; भाविकांना राखी पौर्णिमेची भेट

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तपोवन मैदान येथे सभेची पूर्वतयारी व नियोजनाची पाहणी केली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने म्हणाले, या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, तसेच हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे- पाटील,  धनंजय मुंडे, आदिती तटकरे अनिल पाटील, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे आदी मंत्री , महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ,  स्थायी समितीचे माजी सभापती राजु लाटकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, पदाधिकारी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister ajit pawar rally in kolhapur ncp claim more than one lakh people will gather zws