कोल्हापूर : रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गातील शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भुसंपादन करू देणार नाही, अशी भूमिका घेत निमशिरगांव ता. शिरोळ येथे जमीनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याने सोमवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू; राजू शेट्टी यांची घोषणा

शासनाने रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाला चौपट मोबदला दिला आहे. मात्र याच मार्गातील अंकली ते चोकाक या मार्गावरील रस्त्यावर महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दुप्पट मोबदल्याच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे संतप्त होऊन शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याच शेतकऱ्याची शक्तीपीठ महामार्गात जमीन जात असल्याने शेतकरी भूमिहीन होणार आहे.