कोल्हापूर : "आगामी लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढताना पूर्ण तयारीने उतरणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे," असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी प्रचाराचे रणशिंग फुंकले. आंबा (ता. शाहूवाडी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या अभ्यास शिबीरास आजपासून सुरुवात झाली. दोन दिवसांच्या शिबिरात अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष - संघटनेची राजकीय वाटचाल, संघटनात्मक बांधणी, लोकसभा निवडणुकीची तयारी आदी विषयांवर मते मांडलीत. स्वाभिमानी पक्षाचे प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, जनार्दन पाटील, पोपट मोरे, शैलेश आडके, संदीप राजोबा आदी उपस्थित होते. हेही वाचा - “…असं वक्तव्य एखादी ‘सटवी’च करू शकेल”, चित्रा वाघ संतापल्या; नेमकं काय आहे प्रकरण? मागील निवडणुकीत चूक सन २०१९ च्या निवडणुकीत आमच्याही काही चुका झाल्यात. त्याचा परिणाम निकालात झाला, अशी कबुली देवून शेट्टी म्हणाले, आगामी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर लढवणार आणि जिंकणारदेखील. हेही वाचा - जोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत संप संपवणार नाही, गोंदियात संप सुरूच खोके संस्कृतीमुळे बदनामी शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मतदारसंघात आ वासून उभे आहेत. त्यांना मला न्याय द्यायचे आहे. खोक्यांच्या संस्कृतीमुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. आमची रस्त्यावरची लढाई संपलेली नाही, असे शेट्टी म्हणाले.