Gautam Gambhir’s Best Playing XI of the World Cup 2023 : टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने २०२३ च्या विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. या संघात गंभीरने चार भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक यांना सलामीवीर म्हणून या संघात ठेवण्यात आले आहे, तर विराट कोहलीने या संघात तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. याशिवाय गंभीरने एकाही पाकिस्तानी खेळाडूचा या संघात समावेश केलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शमी आणि बुमराहलाही गंभीरच्या टीममध्ये मिळाले स्थान –

रोहित आणि विराट व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना गौतम गंभीरच्या विश्वचषकातील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. या दोन्ही गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. मोहम्मद शमी २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने ७ सामन्यात २४ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने ११ सामन्यात २० विकेट घेतल्या होत्या. शमीने या स्पर्धेत तीन वेळा ५ विकेट्स घेतल्या होत्या.

शुबमन गिलला मिळाले नाही स्थान –

गौतम गंभीरने स्पोर्ट्सक्रिडाशी संवाद साधत असताना आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. गंभीरने भारताचा सलामीवीर शुबमन गिलचा संघात समावेश केलेला नाही. रोहितशिवाय क्विंटन डी कॉक हा दुसरा सलामीवीर आहे. डी कॉकने २०२३ च्या विश्वचषकात एकूण ४ शतके झळकावली होती. तर विराट कोहलीने ३ शतके झळकावली होती. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रच्या नावावरही ३ शतके आहेत.

हेही वाचा – IND vs AUS 3rd T20 : “ते रोबोट नाहीत…”, टी-२० मालिका मध्येच सोडणाऱ्या खेळाडूंबाबत पॅट कमिन्सची प्रतिक्रिया

गंभीरच्या संघात दोन आफ्रिकन खेळाडूंचा समावेश –

गंभीरच्या या संघात भारतातून ४, दक्षिण आफ्रिकेतून ३, अफगाणिस्तानचे २, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी १ खेळाडू निवडला गेला आहे. डी कॉक व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेन आणि मार्को जॅन्सन यांना स्थान मिळाले आहे. अफगाणिस्तानकडून राशिद खान आणि अजमतुल्ला उमरझाई यांची निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंडचा डॅरेल मिशेल आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल यांचा संघात समावेश आहे.
गौतम गंभीरची २०२३ च्या विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनची : क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, विराट कोहली, डॅरेल मिशेल, हेनरिक क्लासेन, ग्लेन मॅक्सवेल, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॉन्सन, रशीद खान, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir picks his best playing xi for odi world cup 2023 vbm