Pat Cummins' big statement regarding the players leaving the T20I series against India : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी विश्वचषक २०२३ मध्ये सहभागी असलेल्या अनेक खेळाडूंची निवड केली होती, परंतु आता यातील बहुतांश खेळाडू मायदेशी परततील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी संघातील फेरबदलाची माहिती दिली आणि सांगितले की ट्रॅव्हिस हेड व्यतिरिक्त, इतर सर्व विश्वचषक विजेते खेळाडू परततील. दुसऱ्या सामन्यानंतरच स्टीव्ह स्मिथ आणि अॅडम झाम्पा मायदेशी परतले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा वनडे आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्सनेही या खेळाडूंबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. क्रिकेट.कॉम.एयूनुसार, स्टीव्ह स्मिथ आणि अॅडम झाम्पा गुवाहाटीतील तिसऱ्या टी-२० पूर्वीच मायदेशी परतले आहेत, तर ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस आणि सीन अॅबॉट उद्या परततील. झाम्पा आणि मॅक्सवेल पहिला सामना खेळू शकले नाहीत आणि तिरुवनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात पुनरागमन केले. त्याचबरोबर या मालिकेत अद्याप एकही सामना न खेळलेला ट्रेव्हिस हेड भारतातच थांबणार आहे. विकेटकीपर-फलंदाज जोश फिलिप आणि 'बिग हिटिंग स्पेशालिस्ट' बेन मॅकडरमॉट हे गुवाहाटीमध्ये आधीच संघात सामील झाले आहेत. तसेच तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध आहेत. त्याच वेळी, डावखुरा वेगवान गोलंदाज बेन द्वारशुईस आणि फिरकी गोलंदाज ख्रिस ग्रीन तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर संघात सामील होतील. हेही वाचा - IPL 2024: जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स सोडणार? सोशल मीडियावर एमआयला केले ‘अनफॉलो’, इन्स्टा स्टोरी व्हायरल ते रोबोट नाहीत - पॅट कमिन्स सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर वर्ल्ड कप ट्रॉफीसह उपस्थित असलेल्या पॅट कमिन्सने भारतातून परतलेल्या खेळाडूंबाबत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, विश्वचषक खेळलेल्या खेळाडूंना परत बोलावण्याचा निर्णय मी समजू शकतो. कारण ही इतर खेळाडूंसाठी एक चांगली संधी असेल.फॉक्स क्रिकेटने ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या हवाल्याने म्हटले आहे की, "मला त्यांचा राग नाही. हे काही महिने खूपच व्यस्त राहिले आहेत. ते माणसं आहेत. ते रोबोट नाहीत. विश्वचषकात योगदान दिल्यानंतर लगेच काही दिवसांनी खेळणे अवघड आहे. त्यामुळे माझी त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही." हेही वाचा - IND vs AUS: मालिका गमावण्याच्या भीतीने ऑस्ट्रेलियाने केले संघात सहा बदल, जाणून घ्या प्लेईंग इलेव्हन भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (२८ नोव्हेंबर) होणार आहे. दोन्ही संघ गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर दोन हात करणार आहेत. दोन सामने जिंकून टीम इंडिया मालिकेत २-०ने आघाडीवर आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेत अजेय आघाडी घेण्यावर सूर्यकुमार यादवच्या संघाची नजर असेल.