Hardik wife Natasha’s Insta story viral after divorce discussion : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र, याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सोशल मीडियावर घटस्फोटाची चर्चा आहे. दरम्यान, आता नताशाने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशी तरी पोस्ट केलीय ज्यामुळे खळबळ उडाली आहे. वास्तविक, नताशाने तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक स्टोरी पोस्ट केल्या आहेत, ज्यापैकी एक सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नताशाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये ती तिचा मुलगा अगस्त्यासोबत दिसत आहे. यासोबतच तिने पाठीमागे एक इंग्रजी गाणेही जोडले आहे. त्याच वेळी, तिच्या पुढील दोन स्टोरींमध्ये ती वर्कआउट करताना दिसत आहे. काही तासांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर आणखी एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यामध्ये नताशाने लिहिले होते, ‘कोणीतरी रस्त्यावर येणार आहे.’ या पोस्टच्या पार्श्वभूमीत ड्रायव्हिंग स्कूल मॅन्युअलचा एक साइनबोर्ड दिसत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडूनही याविषयी प्रतिक्रिया येत आहेत.

नताशाने आडनाव हटवले –

नताशाची इन्स्टा स्टोरी व्हायरल

वास्तविक, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचे आडनाव हटवले आहे. असे म्हटले जात होते की, नताशा आधी तिचे नाव इन्स्टाग्रामवर ‘नताशा स्टॅनकोविक पंड्या’ असे लिहायची, पण आता तिने पंड्या आडनाव काढून हटवले आहे. यानंतर दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. विशेष म्हणजे ४ मार्चला नताशाचा वाढदिवस होता. पण हार्दिक पंड्याने तिच्या शेवटच्या वाढदिवसाला एकही सोशल मीडिया पोस्ट शेअर केली नव्हती. नताशा आणि हार्दिक दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. पण पंड्याच्या टाइमलाइनवर वाढदिवसासंदर्भात एकही पोस्ट दिसली नाही.

हेही वाचा – ‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

यंदा आयपीएल सामन्यासाठी पण नताशा दिसली नाही –

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ चा हंगाम खेळला, ज्यामध्ये संघाची कामगिरी खूपच खराब होती आणि ते प्लेऑफ्ससाठी देखील पात्र ठरू शकले नाहीत. या संपूर्ण स्पर्धेतही नताशा मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्याला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये दिसली नाही. असा दावाही केला जात आहे की नताशाने हार्दिक पंड्यासोबतच्या नुकत्याच केलेल्या सर्व पोस्ट सोशल मीडियावरून हटवल्या आहेत. हार्दिक आणि नताशा बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर एकत्र दिसत नाहीत. नताशा आणि हार्दिक यांचे २०२० मध्ये लग्न झाले असून दोघांनाही एक मुलगा आहे.

हेही वाचा – SRH vs RR : “वडिलांचा उल्लेख विशेषतः महत्वाचा…”, हैदराबाद फायनलमध्ये पोहोचल्यानंतर अभिषेक शर्मा असं का म्हणाला?

हार्दिकच्या संपत्तीतील इतका मोठा हिस्सा होणार नताशाच्या नावे?

मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, रिपोर्टनुसार घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याच्या संपत्तीतील ७० टक्के संपत्ती ही नताशाच्या नावे होणार आहे, यामुळे हार्दिक पंड्याची आर्थिक स्थिती खराब होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या संबंधित अनेक पोस्टदेखील व्हायरल होत आहेत. हार्दिक पांड्याने मुंबईत एक अपार्टमेंट घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने यासाठी ३० कोटी रुपये मोजले आहेत. याशिवाय त्याचे वडोदरा येथे एक पेंटहाऊस आहे, त्याची किंमतही करोडोंमध्ये आहे. मात्र, घटस्फोटानंतर पंड्याची आर्थिक स्थिती बिघडू शकते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya wife natasha stankovic insta story viral amid divore rumours wrote someone is about to get on street vbm