Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks : भारतीय संघाबाहेर असलेला सलामीवीर शिखर धवन सध्या जिओ सिनेमावर सुरू असलेल्या ‘धवन करेंगे’ शोमुळे चर्चेत आहे. शिखर धवन आयपीएल २०२४ च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसला होता, परंतु दुखापतीमुळे त्याला हंगामाच्या मध्यभागी पायउतार व्हावे लागले. यानंतर सॅम करनने पंजाब किंग्जची कमान हाती घेतली. आयपीएल २०२४ मध्ये, पंजाब किंग्स लीग टप्प्यातील १४ पैकी केवळ ५ सामने जिंकू शकले आणि गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिले. अशात शिखर धवनने भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजबरोबरच्या त्याच्या लग्नाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
धवन अजून काही आयपीएल सीझन खेळू शकतो, पण टीम इंडियात त्याचे पुनरागमन आता अशक्य दिसत आहे. तसेच भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज सध्या डब्ल्यूपीएलमध्ये गुजरात जायंट्स संघात मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहे. अलीकडेच ती शिखर धवनसोबत जिओ सिनेमाच्या ‘धवन करेंगे’ या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये धवनने मितालीबरोबरच्या लग्नाच्या अफवांवर खुलेपणाने प्रतिक्रिया दिया. शिखर धवन म्हणाला, मी ऐकले माझे मिताली राजशी लग्न होणार आहे, असे म्हणताच मिताली आणि धवन जोरजोरात हसू लागले.
शिखरने ‘धवन करेंगे’ शोमध्ये लग्नाबद्दल केला खुलासा –
भारताचा अनुभवी फलंदाज शिखर धवनने स्वत:बद्दल एक रोचक खुलासा केला आहे. शिखर धवनने ‘धवन करेंगे’ शोमध्ये माजी महिला क्रिकेटपटू मिताली राजसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. याशिवाय धवनने कार अपघातानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतबद्दलही आपले मते मांडले. या शोमध्ये धवन पहिल्यांदा म्हणाला, ‘मी ऐकले की माझे मिताली राजशी लग्न होणार आहे.’ हे ऐकून दोघेही हसायला लागतात. मिताली राज धवनच्या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. यादरम्यान धवनने मितालीबरोबरच्या लग्नाची अफवा असल्याचे स्पष्ट केले. शिखर धवन म्हणाला की, ही एक विचित्र अफवा आहे.यादरम्यान शिखरने मितालीला क्रिकेट आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. यानंतर शिखनर धवने या शो दरम्यान ऋषभ पंतचे कौतुक केले.
हेही वाचा – ‘…तर अशा टॅलेंटचा उपयोग काय?’, हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर सुनील गावसकर रियान परागवर संतापले
शिखर धवन ऋषभबद्दल काय म्हणाला?
शिखर धवननेही शोदरम्यान ऋषभ पंतचे कौतुक केले. धवन म्हणाला, “अपघातानंतर त्याने ज्या प्रकारे स्वत:ला हाताळले आहे त्याचे मला कौतुक करायला आवडेल. त्याने ज्या प्रकारे पुनरागमन केले आणि आयपीएलमध्ये खेळून भारतीय संघात स्थान मिळवले, ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहे. त्याच्या शानदार पुनरागमनासाठी मी खूप आनंदी आहे. मला त्याचा अभिमान आहे.”