Abhishek Sharma credits dad for bowling : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२४ च्या क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. सनरायझर्स हैदराबादच्या या यशानंतर अभिषेक शर्मा आपल्या वडिलांची आठवण करताना दिसला. सामना संपल्यानंतर तो इथे वडिलांचा उल्लेख करणे आवश्यक आहे, असे म्हणताना दिसला. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हते. आता प्रश्न असा आहे की अभिषेक असं का म्हणाला? राजस्थान रॉयल्सविरुद्ध सनरायझर्स च्या विजयाचा त्याच्या वडिलांशी काय संबंध आहे? चला तर जाणून घेऊया.

संपूर्ण हंगामात स्फोटक फलंदाजी करताना दिसणारा अभिषेक शर्मा क्वालिफायर २ मध्ये बॅटने फारसे काही करू शकला नाही. मात्र, ५ चेंडूंच्या छोट्या इनिंगमध्ये त्याचा स्ट्राईक रेट इथेही २०० च्या वर होता. त्याने १२ धावा केल्या. पण, त्याने आतापर्यंत दाखवलेल्या खेळाच्या तुलनेत हे काहीच नाही. अशा परिस्थितीत जेव्हा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्याकडे चेंडू सोपवला, तेव्हा आधी स्वत: चकित झाला, यानंतर त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले.

Sunil Gavaskar furious with Riyan shot selection
‘…तर अशा टॅलेंटचा उपयोग काय?’, हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर सुनील गावसकर रियान परागवर संतापले
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Pat Cummins credits Daniel Vettori for SRH victory
SRH vs RR : डॅनियल व्हिटोरीच्या मास्टरस्ट्रोकने बदलला सामना! पॅट कमिन्सने विजयानंतर केला मोठा खुलासा
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Video Neeta Ambani Requesting Chats With Rohit Sharma
नीता अंबानी रोहित शर्माला काय म्हणाल्या? मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर ‘ते’ संभाषण कॅमेऱ्यात कैद, Video पाहा

बॅटने अपूर्ण राहिलेले काम बॉलने केले पूर्ण –

अभिषेक शर्माने सांगितले की, या सामन्यात तो गोलंदाजी करणार आहे, हेही माहित नव्हते. पण, ही संधी मिळाल्याने तो खूश होता आणि त्याने त्याचा फायदाही घेतला. गोलंदाजी करायला मिळाल्याने आश्चर्यचकित झालेल्या अभिषेक शर्माने आयपीएल २०२४ मध्ये प्रथमच ४ षटकांचा कोटा पूर्ण करत सर्वांना आश्चर्यचकित केले. यादरम्यान त्याने २४ धावा देत संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर या दोन स्फोटक फलंदाजांना तंबूता रस्ता दाखवला.

हेही वाचा –SRH vs RR : डॅनियल व्हिटोरीच्या मास्टरस्ट्रोकने बदलला सामना! पॅट कमिन्सने विजयानंतर केला मोठा खुलासा

अभिषेक शर्मा वडिलांबद्दल काय म्हणाला?

अभिषेक शर्माने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या क्वालिफायर २ मध्ये चेंडूने केलेल्या दमदार कामगिरीचे श्रेय त्याच्या वडिलांना दिले. तो म्हणाला की, “मी माझ्या फलंदाजीवर खूप मेहनत घेतो. पण, या काळात मी माझ्या वडिलांसोबत माझ्या गोलंदाजीवरही काम करतो. त्यामुळे सामन्यात मी जे काही केले, त्यानंतर त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. कारण या मागील त्यांचीही भूमिका महत्वाची आहे.”

हेही वाचा – SRH vs RR : काव्या मारनने शेवटच्या षटकाचीही वाट न पाहता वडिलांना मारली मिठी, सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल

अभिषेक शर्माचे वडील राजकुमार शर्मा हे देखील त्यांचे प्रशिक्षक आहेत आणि ते लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळले आहेत. मात्र, त्याला पुढे जाण्याची संधी मिळाली नाही. पण, आता मुलगा अभिषेकच्या यशात या वडिलांचा वाटा दुर्लक्षित करता येणार नाही.