ICC Share Trophy Photo With Shahrukh Khan: क्रिकेट आणि बॉलीवूडमध्ये नेहमीच काही ना काही संबंध राहिले आहेत. दोघांच्या या नात्याने चाहत्यांचा उत्साह नेहमीच वाढवला आहे. यावेळी २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक यजमानपद भारताला मिळाले आहे. यापूर्वी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आयसीसीच्या ट्रॉफीसोबत दिसला . शाहरुख खानचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बुधवारी रात्री (१९ जुलै) शाहरुख खानचा आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतचा फोटो आयसीसीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला. या फोटोमध्ये शाहरुख खान विश्वचषक ट्रॉफीकडे अतिशय क्यूट अंदाजात बघताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना लिहिले आहे की, “तो जवळपास आला आहे…” यावेळी टीम इंडियाला १९८३ आणि २०११ नंतर तिसरा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे.

अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या –

आयसीसीच्या या फोटोने केवळ क्रिकेटप्रेमीच नव्हे तर शाहरुख खानच्या चाहत्यांचीही मने जिंकली. अनेक युजर्सनी इन्स्टाग्रामवर लिहिले, ‘इंडिया की शान, शाहरुख खान.’ त्याचवेळी काही यूजर्सनी ‘चक दे ​​इंडिया’ चित्रपटाचे भाषण शेअर करण्याची मागणीही आयसीसीकडे केली. काही यूजर्सनी लिहिले, ‘काहीतरी नवीन होणार आहे.’ याशिवाय इतर यूजर्सनी खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी, आयसीसी आणि बीसीसीआयने विश्वचषक २०२३ च्या ट्रॉफीचे अनावरण केले होते. विशेष बाब म्हणजे या ट्रॉफीचे अनावरण अंतराळात करण्यात आले. ट्रॉफी जमिनीपासून एक लाख २० हजार फूट उंचीवर अंतराळात पाठवण्यात आली आणि तेथे तिचे अनावरण करण्यात आले.

हेही वाचा – Asia Cup 2023: “आम्हाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांवर…”; आशिया चषकाच्या वेळापत्रकावर राहुल द्रविडची प्रतिक्रिया

स्पर्धेचे वेळापत्रकही ट्रॉफीचे लाँचिंग त्याच दिवशी जाहीर करण्यात आले. नंतर ट्रॉफी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर नेण्यात आली. वर्ल्ड कप ट्रॉफी सध्या वर्ल्ड टूरवर आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाला ही ट्रॉफी भेट देत आहे. यावेळी विश्वचषकात १० देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

या ट्रॉफीचे अनावरण झाल्यानंतर स्पर्धेचे वेळापत्रकही त्याच दिवशी जाहीर करण्यात आले. त्यानंतर ट्रॉफी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर नेण्यात आली. वर्ल्ड कप ट्रॉफी सध्या वर्ल्ड टूरवर आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाला ही ट्रॉफी भेट देत आहे. यावेळी विश्वचषकात १० देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

हेही वाचा – Auckland Firing: ऑकलंडमध्ये महिला फुटबॉल विश्वचषकाच्या उद्घाटनापूर्वी गोळीबार, दोघांचा मृत्यू

या शहरात होणार विश्वचषक स्पर्धेचे सामने –

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यासाठी अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, धर्मशाळा, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे शहरांचा समावेश आहे. त्याचबरोबक हैदराबादसह गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये सराव सामने खेळवले जातील. १३ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तानचा विश्वचषकातील शानदार सामना पाहायला मिळणार आहे.