India Team For ICC Men’s T20 World Cup 2022: आयसीसी टी २० विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताचा संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाच्या मैदानात उतरणार आहे. आशिया चषकाप्रमाणेच विश्वचषकासाठी सुद्धा के. एल. राहुलवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाची बांधणी झाली असून यावेळी संघात भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याची वापसी झाली आहे. दुसरीकडे रवींद्र जडेजा मात्र अजूनही शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरा झाला नसल्याने संघात दिसणार नाही. आयसीसी टी २० विश्वचषकात आता भारताचे सामने कधी असणार याचे वेळापत्रक सविस्तर जाणून घेऊयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसीने केलेल्या घोषणेनुसार भारत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह सुपर १२ मध्ये आहेत. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यापैकी २ संघांना १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या पात्रता फेरीत आपले बळ सिद्ध करून सुपर १२ मध्ये स्थान मिळवता येणार आहे. टी २० विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत, यामध्ये भारत एकूण पाच सामने खेळणार आहे.

भारताचे टी २० विश्वचषकाचे सामन्यांचे वेळापत्रक

  1. भारत विरुद्ध पाकिस्तान – २३ ऑक्टोबर (मेलबर्न)
  2. भारत विरुद्ध (ग्रुप A) मधील उपविजेते- २७ ऑक्टोबर (सिडनी)
  3. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ३० ऑक्टोबर (पर्थ)
  4. भारत विरुद्ध बांग्लादेश – २ नोव्हेंबर (एडिलेड)
  5. भारत विरुद्ध (ग्रुप B) विजेते – ७ नोव्हेंबर (मेलबर्न)

ICC T20 विश्वचषकासाठी असा असणार भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

दरम्यान, आशिया चषकात हातातोंडाशी आलेला विजय गमावल्यावर भारताला विश्वचषकात मोठी कामगिरी दाखवून देणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc t20 world cup 2022 team india full schedule of matches when is ind vs pak dates svs