IND v AUS T20 World Cup 2024: टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर-८चा सामना भारत वि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय मिळवत उपांत्य फेरी गाठण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरणार आहे. भारताने सुपर८ फेरीतील पहिले दोन सामने जिंकले असून तिसरा सामना जिंकल्यास भारतीय संघ उपांत्य फेरी गाठेल. या सामन्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक व्हीडिओ शेअर केला आहे, या व्हीडिओमध्ये ऑस्ट्रेलिया संघातील मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टॉइनस या दोघांना सर्वाेत्कृष्ट टी-२० प्लेईंग इलेव्हन बनवण्यास सांगितले होते, ज्यामध्ये त्यांनी चार भारतीय खेळाडूंची नावे घेतली. पण यामध्ये रोहित, सूर्यकुमार, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या किंवा ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या संघातील बड्या नावांनाही त्यांनी संधी दिली नाही. पाहूया या दोघांनी निवडेलेली प्लईंग इलेव्हन.

[quiziframe id=44 dheight=282px mheight=417px

स्टार्क आणि स्टॉइनस यांच्यामते टी-२० मधील सर्वाेत्कृष्ट प्लेईंग इलेव्हन कोणती आहे, यांची नावे या दोघांनी जाहीर केली. यादरम्यान एकाच खेळाडूला दोघेही निवडू शकत नाही अशी अट होती. स्टार्क आणि स्टॉइनसने एकमेकांना आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये निवडलं आहे. स्टार्कच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सर्वाधिक ३ भारतीय खेळाडू आहेत तर स्टॉइनसच्या टी-२० संघाचा कर्णधारचं भारतीय खेळाडू आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सध्याच्या घडीला टी-२० क्रमवारीत जगातील सर्वाेत्कृष्ट फलंदाज असलेल्या सूर्यकुमार यादवचा समावेशही करण्यात आलेला नाही. तर लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे भारताचा उत्कृष्ट गोलंदाज जाहीर खानला या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली.

हेही वाचा – IND vs AUS Live Score, T20 World Cup 2024: ऑस्ट्रेलियाचे चक्रव्यूह भेदत भारत सेमीफायनल गाठणार? रोहित शर्मा प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता

मिचेल स्टार्कने आपल्या टी-२० संघाचा कर्णधार कोण असेल हे नाही सांगितले पण त्याने त्याच्या या प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याची पत्नी एलिसा हिली हिची निवड केली आहे. तर आयपीएलमध्ये बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या केकेआरच्या सुनील नारायणची आणि मधल्या फळीत फलंदाजीसाठी विराट कोहलीची निवड केली. तर गोलंदाजीत डेल स्टेनसोबत भारताचे जसप्रीत बुमराह, जहीर खान यांनी संधी दिली. सध्या ऑस्ट्रेलियाकडून एकामागून एक दोन हॅटट्रिक घेणाऱ्या कमिन्स, त्यानंतर हेजलवूड झाम्पा यांनाही त्याने प्लेईंग इलेव्हनमध्ये घेतले नाही.

हेही वाचा – T20 World Cup दरम्यान मोठा अपघात, इरफान पठाणच्या मेकअप आर्टिस्टचा पूलमध्ये बुडून मृत्यू

मिचेल स्टार्कची प्लेईंग इलेव्हन
सुनील नारायण, अॅलिसा हिली, विराट कोहली, मार्कस स्टॉइनस, कायरन पोलार्ड, अँड्रियू सायमंड, एबी डिव्हिलियर्स, जसप्रीत बुमराह, जॅक कॅलिस, डेल स्टेन, जहीर खान

मार्कस स्टॉइनसची प्लेईंग इलेव्हन
ख्रिस गेल, शेन वॉटसन, निकोलस पुरन, ग्लेन मॅक्सवेल, आंद्रे रसेल, एस एस धोनी (कर्णधार), टीम डेव्हिड, लसिथ मलिंगा, रशीद खान, मिचेल स्टार्क, शेन वॉर्न