KL Rahul Form: भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुलची बॅट गेल्या काही काळापासून शांत आहे. नागपूर कसोटीतील भारताच्या पहिल्या डावातही राहुलने अतिशय संथ फलंदाजी केली आणि नंतर तो बाद झाला. संघातील त्याच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत पण फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे मत वेगळे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी बांगलादेश दौऱ्यावर झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत राहुलची बॅट चालली नाही. त्यानंतर लग्नामुळे त्याला नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतून ब्रेक देण्यात आला होता. दरम्यान, शुबमन गिलची कामगिरी खूप चांगली होती आणि पहिल्या कसोटीत त्याला सलामीवीर म्हणून खेळवण्याची मागणी होत होती, परंतु संघ व्यवस्थापनाने राहुलवर विश्वास दाखवला, जो तो पाळू शकला नाही. भारताच्या पहिल्या डावात, त्याने ७१ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने २० धावा केल्या आणि टॉड मर्फीने त्याला सोपा झेल दिला.

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले की, रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १२० धावांसाठी खूप मेहनत घ्यावी लागली. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नसून त्यावर धावा काढण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, असे त्याने मान्य केले. रोहितचे शतक आणि रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात १४४ धावांची आघाडी घेतली.

हेही वाचा: IND vs AUS: अखेर नागपूरच्या खेळपट्टीमागील रहस्य उलगडले! मार्मिक टिप्पणी करत सुनील गावसकरांनी टोचले कांगारूंचे कान

खेळपट्टीवर फलंदाजी सोपी नव्हती

दिवसाचा खेळ संपल्यानंतर राठोड म्हणाला, “रोहितची ही खास खेळी होती आणि त्याला धावा करताना पाहून आनंद झाला. त्याने चांगला आत्मविश्वास दाखवला आणि ही खेळी त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाची होती कारण या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. रोहितने डावाची सुरुवात केल्यापासून काही शानदार खेळी खेळल्या आहेत पण चेन्नईमध्ये १६१ धावांसह त्याची तीन शतके खास आहेत, ज्यात एका शतकासह शुक्रवारी ओव्हल आणि संथ खेळपट्टीवरील शतक देखील सामील आहे.

राठोड म्हणाले, “ही त्याच्या फलंदाजीची खासियत आहे. त्याने इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यांवर धावा केल्या पण त्याच्या खेळीबद्दल बोलायचे झाले तर त्याला धावा करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. सुरुवातीला काही धावा केल्यावर रोहितला सहज धावा मिळतात पण इथे त्याला खूप मेहनत करावी लागली. भारताने भलेही चांगली आघाडी घेतली असेल पण एवढ्यावरच राठोडला आत्मसंतुष्ट व्हायचे नाही. तो म्हणाला, “मला नाही वाटत. शेवटचा चेंडू टाकेपर्यंत तुम्ही असे म्हणू शकत नाही.” राठोडला विचारण्यात आले की कुलदीप यादवपेक्षा अक्षरला प्राधान्य दिले जाते कारण तो चांगला फलंदाज आहे, ज्याला त्याने नकार दिला. तो पुढे म्हणाला, “तो (अक्षर) खूप चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे त्याच्या फलंदाजीचा विचार केला गेला नाही. होय, पण त्याची फलंदाजी संघासाठी बोनस आहे.”

हेही वाचा: IND vs AUS: “अभी बैटिंग विकेट, जब हम बॉलिंग करेंगे तो…” खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना अक्षरने दिले सडेतोड उत्तर

राहुलला संधी का मिळतेय?

खराब फॉर्म असूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सलामीवीर केएल राहुलचाही राठौडने बचाव केला. तो म्हणाला, केएलसाठी खरे सांगायचे तर, त्याने खेळलेल्या शेवटच्या १० कसोटी डावांमध्ये त्याच्या नावे काही शतके आणि दोन अर्धशतके आहेत. त्याने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये शतके झळकावली आहेत. प्लेइंग इलेव्हनमधील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी आम्ही सध्या त्या टप्प्यावर आहोत असे मला वाटत नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus is kl rahuls place in danger indias batting coach vikram rathod gave a shocking answer avw