भारत विरुद्ध बांगलादेश संघात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील आज जहूर अहमद चौधरी स्टेडियम चट्टोग्राम येथे तिसरा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला सकाळी साडेअकराला सुरुवात होणार आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाची कमान रोहितच्या अनुपस्थित केएल राहुलच्या हाती आहे. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यजमान बांगलादेश संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर आजचा सामनादेखील जिंकून भारताला क्लीन स्वीप देण्याचा निर्धार असणार आहे. तसेच भारतीय संघासाठी आजचा सामना करो या मरोचा असणार आहे. भारताला आपली प्रतिष्ठा जपायची असेल, तर कोणत्याही परिस्तथितीत विजय नोंदवावाच लागेल.

भारतासमोर व्हाईट वॉश टाळण्याचे आव्हान –

भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यातील ही पाचवी द्विपक्षीय वनडे मालिका आहे. सध्याच्या मालिकेसह, टीम इंडियाने आतापर्यंत ५ पैकी २ द्विपक्षीय वनडे मालिका गमावल्या आहेत. गेल्या वेळी २०१५ मध्ये बांगलादेशने २-१ असा पराभव केला होता. यावेळी जर भारतीय संघ तिसरा सामनाही हरला तर बांगलादेशविरुद्धची ही पहिलाच व्हाईट वॉश असेल. गेल्या वेळी म्हणजे २०१५ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा – INDW vs AUSW 1st T20: ऑस्ट्रेलियाचा भारतावर ९ विकेट्सने मोठा विजय; बेथ मुनीच्या झंझावातापुढे टीम इंडियाने टेकले गुडघे

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक</p>

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): अनामूल हक, लिटन दास (कर्णधार), शकीब अल हसन, यासिर अली, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, इबादत हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban 3rd odi bangladesh win the toss and decide to bowl first check out the playing xi of both the teams vbm
First published on: 10-12-2022 at 11:23 IST