IND vs ENG Michael Vaughan statement on Suryakumar Yadav : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यात माहीर आहे. मात्र, गेल्या काही सामन्यांपासून त्याची बॅट शांत आहे. सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये धावा केल्या नाहीत. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने सूर्यकुमार यादवच्या अधिक आक्रमक वृत्तीवर टीका केली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार पॉवरप्लेमध्ये फ्लिक शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायकल वॉनने म्हटले आहे की, सूर्यकुमार आवश्यकतेनुसार खेळत नाही आणि खूप आक्रमक खेळण्याच्या नादात विकेट गमावत आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या सुरू असलेल्या मालिकेत फार कमी वेळ क्रीझवर राहू शकला आहे. त्याने तीन सामन्यांमध्ये १७ चेंडूंचा सामना केला आणि केवळ २६ धावा केल्या आहे.

मायकला वॉन काय म्हणाला?

मायकल वॉन क्रिकबझवर म्हणाला की, “जेव्हा तुम्ही नेहमी आक्रमक राहा असे म्हणता, याचा अर्थ योग्य चेंडू निवडून आक्रमक होणे असा होतो. तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही. भारत कोणत्या कारणासाठी जगज्जेता आहे, त्यासाठी त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. खेळाडूंना चांगल्या फॉर्ममध्ये येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मैदानावर वेळ घालवणे. सध्या सूर्यकुमार यादव मैदानावर काही चांगले फटके मारत आहे, पण डोळ्याची पापणी लवताच तो बाद होऊन माघारी परतत आहे. तो कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान न देता माघारी जात आहे.”

इंग्लंडचा माजी खेळाडू म्हणाला, “जर मालिकेत अशी वेळ आली असेल जेव्हा सूर्याला आपली कामगिरी सुधारण्यासाठी पाचव्या गीअरवरून तिसऱ्या गीअरवर जावे लागले असेल, तर ती वेळ राजकोटमध्ये आली होते. ते २१० किंवा २२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत नव्हते. लक्ष्य योग्य होते. त्याला फक्त हुशारीने खेळायचे होते आणि ते साध्य करायचे होते.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng michael vaughan slams suryakumar yadav for poor outing against england in t20i series vbm