Washington Sundar's fighting half-century! India scored only 219 runs against New Zealand's penetrating batting | Loksatta

IND vs NZ 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदरचे झुंजार अर्धशतक! न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताने केल्या केवळ २१९ धावा

न्यूझीलंडच्या जबदरस्त गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज निष्प्रभ ठरले. मालिकेत बरोबरी साधाय्रची असेल तर टीम इंडियाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

IND vs NZ 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदरचे झुंजार अर्धशतक! न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताने केल्या केवळ २१९ धावा
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा व अखेरचा एकदिवसीय सामना बुधवारी म्हणजेच आज ख्राईस्टचर्च खेळवला जात असून सामन्याआधी पावसाने हजेरी लावल्याने नाणेफेकीला थोडा विलंब झाला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात न्यूझीलंडशी दोन हात करत आहे. न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. सर्वबाद २१९ धावा करत भारताने विजयासाठी केवळ २२० धावांचे लक्ष किवी संघासमोर ठेवले आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन नाणेफेकीच्या बाबतीत पुन्हा नशीबवान ठरला, त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आज भारतीय संघासमोर मालिका वाचवण्याच्या आव्हानासोबतच क्रमावारीत सुधारणा करण्याचे लक्ष्य असणार होते. आजच्या सामन्यात तरी संजू सॅमसनला  संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षाच राहिली. वॉशिंग्टन सुंदरच्या झुंझार अर्धशतकाने भारत सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचला. त्याने ५१ धावा केल्या.

सलामीवीर कर्णधार शिखर धवन आणि युवा फलंदाज शुबमन गिल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली आहे. पहिल्या १० षटकात भारताने ४३/१ धावा झाल्या आहेत. पावसाळी वातावरण असल्याने चेंडू स्विंग होत आहे. टिम साऊदीने चांगली गोलंदाजी केली आहे. धवन हा ३५ चेंडूत २५ धावा केल्या. शुबमन गिलने २२ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. भारताचा इनफॉर्म फलंदाज श्रेयस अय्यरचे अर्धशतक हुकले त्याने ४९ धावा केल्या. मिस्टर ३६० सूर्यकुमार यादव देखील अवघ्या ५ धावा करून बाद झाला. बाकी कोणालाच मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

हेही वाचा :   IND vs NZ 3rd ODI: तेच ते अन् तेच ते… पंतने पुन्हा संधीची माती केली; संजू सॅमसनला डावलल्याने संघ व्यवस्थापन चाहत्यांच्या रडारवर

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ढगाळ हवामानाचा फायदा घेत शानदार गोलंदाजी केली. अॅडम मिल्ने आणि डॅरिल मिशेल या दोघांनी प्रत्येकी ३ गडी बाद करत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. तर टिम साऊदी २ गडी बाद त्यांना साथ दिली. मिचेल सँटनर आणि लॉकी फर्ग्युसन यांना एक गडी बाद करण्यात यश आले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 11:23 IST
Next Story
Fifa World Cup 2022: कतारच्या अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; विश्वचषकाच्या तयारीत ४०० ते ५०० मजुरांचा मृत्यू, पाहा व्हिडिओ