भारतीय संघाचे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न यंदाही अपूर्ण राहिले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १५ वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी निर्धार करुन ऑस्ट्रेलिया गाठली होती. येथे टीम इंडियाची सुपर-१२ पर्यंत कामगिरी उत्कृष्ट होती, मात्र उपांत्य फेरीत इंग्लंडने १० विकेट्सने पराभव केल्याने भारताचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाला आता दोन देशांचा दौरा करायचा आहे, ज्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा न्यूझीलंड दौरा –

टी-२० विश्वचषक संघात समाविष्ट भारतीय संघातील फक्त ७ खेळाडू मायदेशी परतणार आहेत, तर इतर खेळाडू न्यूझीलंडचा दौरा करणार आहेत. टी-२० विश्वचषकनंतर भारताला प्रथमच न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे, जिथे त्यांना तीन सामन्यांची टी-२० मालिका तसेच तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने आधीच संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या न्यूझीलंड दौऱ्यावर टी-२० संघाचा कर्णधार असेल, तर शिखर धवन वनडे संघाचे नेतृत्व करेल. भारतातील न्यूझीलंड दौऱ्यातील सर्व सामने अॅमझॉन प्राईमवर लाइव्ह स्ट्रीम केले जातील.

न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –

पहिला टी-२० – १८ नोव्हेंबर, दुपारी १२ वा.
दुसरा टी-२० – २० नोव्हेंबर, दुपारी १२ वा.
तिसरा टी-२० – २२ नोव्हेंबर दुपारी १२ वा.
पहिला वनडे – २५ नोव्हेंबर, सकाळी ७ वा.
दुसरी वनडे – २७ नोव्हेंबर, सकाळी ७ वा.
तिसरी वनडे – ३० नोव्हेंबर, सकाळी ७ वा.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –

भारतीय टी-२० संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव सिंग हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

भारतीय वनडे संघ: शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

भारताचा बांगलादेश दौरा –

न्यूझीलंड दौऱ्यावर हे ६ सामने खेळल्यानंतर भारतीय संघाला बांगलादेशचा दौरा करायचा आहे. या दौऱ्याची सुरुवात ४ डिसेंबर रोजी ढाका येथे होणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्याने होणार आहे. टीम इंडिया या बांगलादेश दौऱ्यावर तीन वनडेसह दोन कसोटी सामने खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह वरिष्ठ खेळाडू बांगलादेश दौऱ्यावर परतणार आहेत. बांगलादेश दौरा डिस्ने प्लस हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केला जाईल, तर तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या विविध नेटवर्कवर टीव्हीवर या सामन्यांचा आनंद घेऊ शकता.

बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –

पहिला वनडे – ४ डिसेंबर, दुपारी १२:३० वा.
दुसरी वनडे – ७ डिसेंबर, दुपारी १२:३० वा.
तिसरी एकदिवसीय – १० डिसेंबर, दुपारी १२:३० वा.
पहिली कसोटी- १४ ते १८ डिसेंबर, सकाळी ९:३० वा.
दुसरी कसोटी- २२ ते २६ डिसेंबर, सकाळी ९:३० वा.

बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघ –

भारतीय एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहं. शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : प्लेयर ऑफ द टूर्नामेंटसाठी नामांकन मिळालेल्यांची नावे जाहीर; विराटसह ‘या’ ९ खेळाडूंचा समावेश

भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India full schedule after t20 world cup 2022 ind vs nz ind vs ban squads match timing and live streaming details vbm