IND vs AUS 4th Test Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावाच्या जोरावर ९१ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने आपल्या पहिल्या डावात ५७१ धावा केल्या. दरम्यानया सामन्यात असे काही घडले आहे, जे भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे. जेव्हा पहिल्या ६ विकेटसाठी ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाने केला एक खास विक्रम –

वास्तविक, टीम इंडियाने आतापर्यंत पहिल्या डावात पाच विकेट्स गमावल्या आहेत. पण सर्वच फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. पण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे, जेव्हा पहिल्या सलग ६ विकेट्ससाठी ५० किंवा त्याहून अधिक धावांची भागादारी करण्यात आली आहे. याआधी ११९३ मध्ये मुंबईत भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात हा पराक्रम करण्यात आला होता. त्या सामन्यात तीन शतके आणि दोन अर्धशतकांच्या भागीदारी होत्या. त्या सामन्यात विनोद कांबळीने द्विशतक झळकावले होते.

पहिल्या ६ विकेटससाठी ५० किंवा त्याहून अधिक धावांची भागादारी –

१.रोहित शर्मा-शुबमन गिल यांच्यात पहिल्यासाठी विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी.
२.शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी.
३.शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी
४.विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यात चौथ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी
५.विराट कोहली आणि श्रीकर भरत यांच्यात पाचव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी
६.सहाव्या विकेटसाठी विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यात सर्वात मोठी १६२ धावांची भागीदारी.

विराट कोहलीचे द्विशतक हुकलं –

या सामन्यात विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये होता, परंतु अवघ्या १४ धावांनी त्याचे द्विशतक हुकले. त्याने ३६४ धावांत १८६ धावा केल्या. यामध्ये त्याने १५ चौकार लगावले. तत्पुर्वी विराट कोहलीने आपले २८ वे कसोटी शतक झळकावले. त्याने आपल्या कसोटी शतकाचा दुष्काळ संपवण्यासाठी १२०५ दिवस घेतले. कसोटीतील शेवटचे शतक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी बांगलादेशविरुद्ध झळकावले होते. हा सामना कोलकातामध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये त्याने १३९ धावा केल्या होत्या. यानंतर कोहली सातत्तायने शतकी खेळी करत राहिला पण त्याला यश मिळाले नाही. गेल्या १० डावात त्याला अर्धशतकही पूर्ण करता आले नाही.

भारताचा पहिला डाव –

भारताने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने ९१ धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक १८६ धावा केल्या. त्याचवेळी शुबमन गिलने १२८ धावांची खेळी केली. अक्षर पटेलनेही ७९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या डावात भारताच्या नऊ विकेट पडल्या, पण श्रेयस अय्यर दुखापतीमुळे फलंदाजीला येऊ शकला नाही. त्यामुळे भारताचा डाव नऊ विकेट्सवर संपला.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: अवघ्या १४ धावांनी हुकलं विराट कोहलीचं द्विशतक; टीम इंडियाने घेतली ९१ धावांची आघाडी

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव –

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी ४८० धावांचा डोंगर उभारला. एवढे मोठे आव्हान उभे करताना त्यांच्या दोन खेळाडूंनी शतक साजरे केले. त्यात उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांचा समावेश आहे. ख्वाजाने ४२२ चेंडू खेळून १८० धावा चोपल्या. त्यात २१ चौकारांचाही समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त ग्रीनने १७० चेंडू खेळून ११४ धावा केल्या. या धावा करताना त्याने १८ चौकार मारले

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India have created history by scoring 50 or more runs for the first 6 wickets against aus test vbm