न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाची कसोटी क्रमावारी धोक्यात आली आहे. सध्याच्या कसोटी क्रमवारीनुसार भारतीय संघ दुसऱया स्थानी आहे. परंतु, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणाऱया कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला तर भारतीय संघाची क्रमवारी एका स्थानाने खाली घसरेल आणि ऑस्ट्रेलिया संघ कसोटी क्रमवारीत दुसऱया स्थानी विराजमान होईल.
न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात भारतीय संघचा ४० धावांनी पराभव झाला. दुसरा कसोटी सामना जरी भारतीय संघाने जिंकला तरी भारतीय संघाची आयसीसी क्रमवारी धोक्यातच राहणार आहे. त्यामुळे क्रमवारी घरण्याची टांगती तलवार भारतीय संघावर आहे. भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे बलाढ्य भारतीय संघावर ही नामुष्की ओढावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India risk losing 2nd spot in icc test rankings