Rising Star Asia Cup 2025 India Squad: रायझिंग स्टार्स आशिया चषक २०२५ साठी बीसीसीआयने भारत अ संघाची घोषणा केली आहे. रायझिंग स्टार्स आशिया चषक २०२५ हा दोहा, कतार येथे होणार आहे. भारत अ संघ पाकिस्तान अ, युएई आणि ओमानसह ब गटात आहे. यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मा १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व करेल, ज्यामध्ये १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी देखीलचा समावेश आहे.
यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्माच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही समावेश करण्यात आला, जो भारत अ संघासाठी पहिल्यांदाच खेळणार आहे. याबरोबरच प्रियांश आर्य, नेहाल वधेरा, सूर्यांश शेडगे, आशुतोष शर्मा व नमन धीर यांसारख्या युवा खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आलं आहे. भारत अ संघात पाच राखीव खेळाडू आहेत.
वैभ सूर्यवंशी पहिल्यांदाच इंडिया अ संघाचा भाग झाला आहे. गेल्या वर्षभरात त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे, ज्यामध्ये आयपीएल आणि इंडिया अंडर-१९ संघातील कामगिरीचा समावेश आहे. आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा प्रियांश आर्य देखील भारत अ संघात पदार्पण करत आहे. मुंबईचा उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेने गेल्या डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये फिनिशर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती.
रायझिंग स्टार आशिया चषक संघात कोणकोणत्या गोलंदाजांनी संधी?
रमणदीप सिंग, नमन धीर, आशुतोष शर्मा आणि अभिषेक पोरेल यांनी देशांतर्गत क्रिकेट तसंच आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. गोलंदाजीत यश ठाकूर, गुर्जपनीत सिंग, विजय कुमार वैशाख, युद्धवीर सिंग चरक, हर्ष दुबे आणि सुयश शर्मा यांना देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे स्थान देण्यात आलं.
रायझिंग स्टार आशिया चषक २०२५साठी भारतीय संघ
जितेश शर्मा (कर्णधार, यष्टिरक्षक), नमन धीर (उपकर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, सूर्यांश शेडगे, रमणदीप सिंग, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, यश ठाकूर, गुर्जपनीत सिंग, विजय कुमार वैशाख, युधवीरेसिंह चरक, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सुयश शर्मा
राखीव खेळाडू: गुरनूर सिंग ब्रार, कुमार कुशाग्र, तनुष कोटियन, समीर रिझवी, शेख रशीद
रायझिंग स्टार आशिया चषक २०२५ साठी भारताचं वेळापत्रक
१४ नोव्हेंबर, शुक्रवार – भारत अ वि. युएई
१६ नोव्हेंबर, रविवार – भारत अ वि. पाकिस्तान अ
१८ नोव्हेंबर, मंगळवार – भारत अ वि. ओमान
२१ नोव्हेंबर, शुक्रवार – सेमीफायनल
२१ नोव्हेंबर, शुक्रवार – सेमीफायनल
२३ नोव्हेंबर, रविवार – फायनल
