India vs Australia 2nd ODI LIVE Score: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामनाही भारताने गमावला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा २ विकेट्सने पराभव केला आणि यासह वनडे मालिका २-०ने आपल्या नावे केली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ९ गडी बाद २६४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २६५ धावांची गरज आहे. भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने ९, विराट कोहली ०, श्रेयस अय्यर ६१, केएल राहुल ११, अक्षर पटेल ४४, वॉशिंग्टन सुंदरने १२, नितीश रेड्डीने ८, हर्षित राणाने नाबाद १३ आणि अर्शदीप सिंगने १३ धावांची खेळी केली.
IND vs AUS Live: वॉशिंग्टनच्या ‘सुंदर’ चेंडूवर अॅलेक्स कॅरीची बत्तीगुल!
वॉशिंग्टनच्या सुंदरच्या गोलंदाजीवर अॅले्क्स कॅरी ९ धावा करत माघारी परतला आहे.
IND vs AUS Live: रेनशॉ झेलबाद
अक्षर पटेलने २२व्या षटकात रेनशॉला क्लीन बोल्ड करत भारताला तिसरी विकेट मिळून दिली. शॉर्ट ३० धावांवर माघारी परतला.
IND vs AUS Live: भारताची डोकेदुखी गेली! हेड स्वस्तात परतला माघारी
ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला आहे. ट्रॅव्हिस हेड २८ धावा करत माघारी परतला आहे.
India vs Australia Live: ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का! मिचेल मार्श परतला माघारी
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे. अर्शदीप सिंगने मिचेल मार्शला ११ धावांवर माघारी धाडलं आहे.
IND vs AUS Live: भारतीय संघाचे ८ फलंदाज तंबूत! अक्षर पटेल- नितीश रेड्डी परतले माघारी
भारतीय संघाला सातवा धक्का बसला आहे. अक्षर पटेल ४३ धावा करत तर नितीश रेड्डी ८ धावा करत माघारी परतले आहे.
IND vs AUS Live: भारताचा निम्मा संघ तंबूत! अय्यर पाठोपाठ केएल राहुल परतला माघारी
भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. श्रेयस अय्यर पाठोपाठ केएल राहुल ११ धावा करत माघारी परतला आहे.
IND vs AUS Live: भारतीय संघाला चौथा धक्का! अर्धशतक झळकावल्यानंतर श्रेयस अय्यर परतला माघारी
भारतीय संघाला चौथा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यर ६१ धावा करत माघारी परतला आहे.
IND vs AUS Live: रोहितचं शतक हुकलं! इतक्या धावा करत परतला माघारी
भारतीय संघाला तिसरा धक्का बसला आहे. रोहित शर्माने दमदार सुरूवात करून दिली. पण तो ७३ धावा करत माघारी परतला आहे.
IND vs AUS Live: श्रेयस अय्यरचं अर्धशतक पूर्ण! टीम इंडिया मजबूत स्थितीत
रोहित शर्मानंतर श्रेयस अय्यरने देखील आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
IND vs AUS: रोहित शर्माचं दमदार पुनरागमन! हिटमॅनचं अर्धशतक पूर्ण
रोहित शर्माने कठीण परिस्थितीत फलंदाजी करताना ७४ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
IND vs AUS Live: रोहित- श्रेयसची जोडी जमली! भारताच्या ५० धावा पूर्ण
भारतीय संघाला सुरूवातीलाच २ मोठे धक्के बसले. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने मिळून भारतीय संघाला ५० धावांच्या पार पोहोचवलं आहे.
IND vs AUS Live: भारतीय संघाला लागोपाठ २ मोठे धक्के
भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला आहे. शुबमन गिल ९ धावा करून माघारी परतला. तर विराट कोहली शून्यावर माघारी परतला आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
ऑस्ट्रेलिया (Australia)मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड
भारत (India)रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
