India vs England 3rd T20I Match Highlights : इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा २६ धावांनी पराभव करत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. बुधवारी राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाहुण्यांनी २० षटकांत नऊ गडी गमावून १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ १४५ धावा करता आल्या. अशाप्रकारे या मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात इंग्लंडला यश आले.
IND vs ENG 3rd T20I Highlights : दोन्ही संघांतील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांत आतापर्यंत एकूण २७ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १५ टी-२० जिंकले आहेत, तर इंग्लिश संघाने १२ जिंकले आहेत.
IND vs ENG Live : राजकोटमधील आतापर्यंत पाच टी-२० सामन्यांतील रेकॉर्ड
राजकोटमध्ये आतापर्यंत पाच टी-२० सामने खेळले गेले आहेत
राजकोटच्या मैदानावर आतापर्यंत पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
India vs England Live Updates : राजकोटची खेळपट्टी फलंदाजीसाठी ठरु शकते फायदेशीर
राजकोटची खेळपट्टी फलंदाजीसाठी ठरु शकते फायदेशीर –
राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमची खेळपट्टी चांगली उसळी आणि वेगासह फलंदाजांसाठी अनुकूल म्हणून ओळखली जाते. त्यामुळे संघांना मोठी धावसंख्या उभारणे सोपे जाते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना अनेकदा फायदा होतो. कारण ते आव्हानात्मक धावसंख्या बनवू शकतात आणि विरोधी संघावर दबाव आणू शकतात. या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होऊ शकते, कारण खेळ पुढे जात असताना परिस्थिती कठीण होत जाते.
IND vs ENG Live : राजकोटमध्ये १८ धावा करताच जोस बटलर इतिहास घडवणार
राजकोटमध्ये १८ धावा करताच जोस बटलर इतिहास घडवणार
https://twitter.com/BCCI/status/1884125350894133352
या सामन्यात जोस बटलर १८ धावा करण्यात यशस्वी ठरला, तर तो भारतीय भूमीवर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. हा विक्रम सध्या अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीच्या नावावर आहे, ज्याने २५टी-२० सामन्यांमध्ये २५.२७ च्या सरासरीने आणि १६४.४९ च्या स्ट्राईक रेटने ५५६ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे आणि या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या ८९ धावा आहे.
टीम इंडियासमोर जोस बटलरला रोखण्याचे आव्हान –
The right energy ?
— BCCI (@BCCI) January 28, 2025
The perfect synergy ?#TeamIndia ?? all in readiness for the 3rd T20I in Rajkot ??#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/VcaEIEHpC7
आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर भारतासाठी धोकादायक ठरला आहे. बटलरने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याने शानदार खेळी केली होती. चेन्नईत बटलरचे अर्धशतक झळकावता आले नाही, तरीही त्याच्या खेळीच्या बळावरच संघाला लढाऊ धावसंख्या गाठण्यात यश आले. आतापर्यंत केवळ कर्णधार जोस बटलरला इंग्लंडकडून फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली आहे. फिरकी गोलंदाजीसमोर धावा काढण्यासाठी त्यांच्या इतर फलंदाजांना संघर्ष करावा लागला आहे. बटलरला रोखण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल.
IND vs ENG Live : तिसऱ्या सामन्याठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग इलेव्हन
तिसऱ्या सामन्याठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग इलेव्हन:
बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.
IND vs ENG Live : भारत सलग पाचवी टी-२० मालिका जिंकण्यासाठी सज्ज
भारत सलग पाचवी टी-२० मालिका जिंकण्यासाठी सज्ज
टीम इंडियाने २०१७ पासून इंग्लंडविरुद्ध सलग चार टी-२० मालिका जिंकल्या आहेत. २०१७ मध्ये भारताने इंग्लंडला तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने, २०१८ मध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने, २०२१ मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने आणि २०२२ मध्ये तीन सामन्यात २-१ ने पराभूत केले आहे. आता सलग पाचवी मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे.