India vs England 3rd Test Test Live Updates: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने दमदार विजयाची नोंद केली होती. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं आणि मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे हा मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकलं आहे. याआधी झालेल्या दोन सामन्यांमध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. मात्र या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आधीच प्लेइंग ११ ची घोषणा केली होती.
इंग्लंडने आपल्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल केला. जोफ्रा आर्चरला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं आहे. तर भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये देखील मोठा बदल करण्यात आला आहे. प्रसिध कृष्णाला विश्रांती देण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल ( कर्णधार), ऋषभ पंत ( यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह</p>
इंग्लंडची प्लेइंग ११: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट , हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर
इंग्लंडला पहिला मोठा धक्का
इंंग्लंडची सलामी जोडी बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने इंग्लंडला चांगली सुरूवात करून दिली. पण, नितीश कुमार रेड्डीने एकाच ओव्हरमध्ये दोघांना बाद करत माघारी धाडलं आहे.. बेन डकेट आणि जॅक क्रॉली स्वस्तात माघारी परतले आहेत.
इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत
या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला आहे. इंग्लंडला नितीश कुमार रेड्डीने आपल्या पहिल्याच षटकात २ मोठे धक्के दिले होते. मात्र, त्यानंतर पोप आणि रुटने दमदार भागीदारी करत संघाची धावसंख्या १३० धावांच्या पार पोहोचवली आहे.
बुमराहचा भन्नाट बॉल
तिसऱ्या सत्राच्या सुरूवातीलाच इंग्लंडला २ मोठे धक्के बसले आहेत. आधी रवींद्र जडेजाने ओली पोपला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर जसप्रीत बुमराहने हॅरी ब्रुकला त्रिफळाचित करून माघारी पाठवलं आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त
या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडला ४ गडी बाद २५१ धावा करता आल्या आहेत. इंग्लंडकडून जो रूट ९९ धावांवर माघारी परतला आहे. तर बेन स्टोक्स ३९ धावांवर नाबाद माघारी परतला आहे. इंग्लंडकडून जॅक क्रॉली १८, बेन डकेट २३, ओली पोप ४४ आणि हॅरी ब्रुक ११ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या दिवशी १ धाव करताच रूटकडे शतक पूर्ण करण्याची संधी असणार आहे.