India vs England 4th T20I Highlights : पुण्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडचा १५ धावांनी पराभव इतिहास घडवला. भारताने सलग पाचव्या टी-२० मालिकेत इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. भारतासाठी या सामन्यात हार्दिक-शिवमच्या अर्धशतकानंतर हर्षित राणाने ३ विकेट्स गोलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान देत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात भारताने १८२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १६६ धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अभेद्य आघाडी घेतली आहे.

Live Updates

IND vs ENG 4th T20I Highlights : दोन्ही संघांतील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांत आतापर्यंत एकूण २८ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १६ टी-२० जिंकले आहेत, तर इंग्लिश संघाने १२ जिंकले आहेत.

17:56 (IST) 31 Jan 2025

India vs England4th T20I Live : पुण्यात कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड?

पुण्यात कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड?

पुण्याच्या मैदानावर आतापर्यंत चार T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला आहे तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी दुसऱ्यांदा या मैदानावर येत आहे, ज्यामध्ये 2012 साली खेळलेला यापूर्वीचा सामना टीम इंडियाने 5 विकेटने जिंकला होता. टीम इंडियाने या मैदानावर आतापर्यंत 2 टी-20 सामने जिंकले आहेत, तर 2 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

17:40 (IST) 31 Jan 2025

IND vs ENG Live : पुण्यातील खेळपट्टी कशी आहे?

पुण्याची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल

एमसीए स्टेडियम पुण्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर ती फलंदाजीसाठी अतिशय योग्य मानली जाते. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते, परंतु त्यानंतर फलंदाज आपली जादू दाखवू शकतील. येथे प्रथम फलंदाजीची सरासरी पाहिली तर ती 165 ते 170 धावांच्या आसपास दिसते. सामन्याच्या वेळी तापमान 30 अंश सेल्सिअस असण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे खेळपट्टी थोडी कोरडी असू शकते आणि अशा परिस्थितीत फिरकीपटूंना जुन्या चेंडूने काही वळण मिळू शकते. मात्र, खेळपट्टीवर काही गवत असेल तर ते फलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते. असे असूनही, खेळ जसजसा पुढे जाईल तसतसा तो थोडा कमी होऊ शकतो, अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

17:22 (IST) 31 Jan 2025

IND vs ENG Live : चौथ्या सामन्याठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग इलेव्हन

चौथ्या सामन्याठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग इलेव्हन

बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड

17:18 (IST) 31 Jan 2025

IND vs ENG Live : भारत सलग पाचवी टी-२० मालिका जिंकण्यासाठी सज्ज

भारत सलग पाचवी टी-२० मालिका जिंकण्यासाठी सज्ज

टीम इंडियाने २०१७ पासून इंग्लंडविरुद्ध सलग चार टी-२० मालिका जिंकल्या आहेत. २०१७ मध्ये भारताने इंग्लंडला तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने, २०१८ मध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने, २०२१ मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने आणि २०२२ मध्ये तीन सामन्यात २-१ ने पराभूत केले आहे. आज पुण्यातील चौथा टी-२० सामना जिंकून सलग पाचवी मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे.

Highlights cricket score India vs England T20I : टीम इंडियाने २०१७ पासून इंग्लंडविरुद्ध सलग पाच टी-२० मालिका जिंकली आहे. २०१७ मध्ये भारताने इंग्लंडला तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने, २०१८ मध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने, २०२१ मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने आणि २०२२ मध्ये तीन सामन्यात २-१ ने पराभूत केले. आता २०२५ मध्ये ३-१ पराभूत केले आहे.