India vs Sri Lanka 3rd T20 Highlights Score Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना शनिवारी, ७ जानेवारी रोजी राजकोटमध्ये खेळवला गेला. भारताने श्रीलंकेला धूळ चारत तब्बल ९१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. राजकोट येथील सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा वादळी खेळी केली. त्याने यादरम्यान शतक झळकावत खास विक्रम आपल्या नावावर नोंदवला. त्याने युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्यापेक्षा जास्त वेळा अशी कामगिरी करण्याचा मान मिळवला आहे. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर अक्षर पटेलला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पहिल्या टी२० मध्ये टीम इंडियाने २ धावांनी विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली होती, तर पुण्यातील दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघाने पुनरागमन करत १६ धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली होती. आता निर्णायक सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी करत नवीन वर्षातील पहिला मालिका विजय नोंदवला. टीम इंडियाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सलग तिसरी मालिका जिंकली. त्याचबरोबर श्रीलंकेने सामना जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले.
सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये तिसरे शतक पूर्ण केले आहे. त्याने ४५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सूर्याने गेल्या वर्षी इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध शतके झळकावली होती. टी२० मध्ये भारताकडून तीन शतके झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माची त्याच्यापेक्षा जास्त शतके आहेत. रोहितने टी२० मध्ये चार शतके झळकावली आहेत.
India vs Sri Lanka 3rd T20 Highlights Match Updates in Marathi: भारत विरुद्ध श्रीलंका टी२० हायलाइट्स अपडेट
पुण्यातील हिरो ठरलेला अक्षर पटेल होम ग्राउंडवर दाखवणार का जलवा? हे आजच्या सामन्यात लवकरच कळणार समजेल. तो मुळचा आनंद जिल्ह्यातील आहे. मागच्या सामन्यात ४ विकेट्स घेत त्याने २४ धावा दिल्या. फलंदाजीतील योगदानाबद्दल बोलायचे झाले तर ६५ धावा घेत त्याने भारताला विजयानजीक नेले होते. मात्र तो बाद झाला आणि भारताचा पराभव झाला.
राजकोटच्या मैदानावर भारतीय संघ गेली ६ वर्षे अजिंक्य आहे. येथे झालेल्या एकूण ४ सामन्यांपैकी भारताला तीन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. २०१७ मध्ये न्यूझीलंडने भारताचा ४० धावांनी पराभव केला होता.
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७९ आणि दुसऱ्या डावात १४९ अशी आहे. फिरकीपटूंना येथे अनेकदा मदत मिळते. वेगवान गोलंदाज संथ चेंडूंचा फायदा घेताना दिसतात. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही दव प्रभावी ठरू शकतो.
पुण्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात अर्शदीप सिंग याच्या वाईट कामगिरीमुळे त्याला तिसऱ्या सामन्यात खेळायला मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला जागा मिळू शकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग याने दुसऱ्या टी२० मध्ये २ षटकात तब्बल ५ नो-बॉल टाकले होते. त्याने पहिल्या षटकातच नो-बॉलची हॅटट्रिक पूर्ण केली होती.
राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. येथे सर्वोच्च धावसंख्या २०२ धावांची आहे. दुसरीकडे, सर्वात कमी धावसंख्येबद्दल बोलायचे तर, ती ८७ धावांची होती, जी दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. येथे धावांची सरासरी १६४ आहे, अशा स्थितीत फलंदाजांवर विश्वास व्यक्त केला जाऊ शकतो. हवामान राजकोटमध्ये नेहमी कोरडे असते. सध्या हिवाळा सुरु असल्याने रात्रीच्या सामन्यात दवाचा परिणाम अधिक होतो. मात्र पहिल्या दोन्ही सामन्यात ज्यांनी पहिले फलंदाजी केली आहे तेच विजयी झाले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दोन्ही कर्णधार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असेल.
राजकोटच्या स्टेडियममध्ये पोहचताच टीम इंडियाचे जोरदार चाहत्यांनी जल्लोष करत स्वागत केले. आतापर्यत भारताने मायदेशात एकही मालिका गमावली नाही. हार्दिक पांड्या हा विक्रम कायम ठेवतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
A warm and traditional welcome in Rajkot as #TeamIndia arrive for the third and final T20I, which will take place tomorrow! ?? #INDvSL pic.twitter.com/6Z7IOGO0BS
— BCCI (@BCCI) January 6, 2023
भारत आणि श्रीलंका यांच्यात टी२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक असा अखेरचा सामना राजकोटला खेळणार आहे. पुण्यातील पराभवाचे उट्टे काढण्याची हार्दिक ब्रिगेडला मोठी संधी असून ते काढण्यासाठी ते पूर्णपणे सज्ज आहेत.
Hello from Rajkot ?
— BCCI (@BCCI) January 7, 2023
We are all set for the #INDvSL T20I series decider ?#TeamIndia | @mastercardindia pic.twitter.com/TEjcczxHT8
India vs Sri Lanka 3rd T20 Highlights Match Updates in Marathi: भारत विरुद्ध श्रीलंका टी२० हायलाइट्स अपडेट
पुण्यातील पराभवाचा वचपा काढत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज राजकोटमध्ये श्रीलंकेला ९१ धावांनी धूळ चारली