India vs Sri Lanka, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला २०३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून पथुम निसंकाने दमदार शतकी खेळी केली. शेवटच्या षटकात तो १०७ धावांवर बाद होऊन माघारी परतला. श्रीलंकेनेही २० षटकांअखेर २०२ धावा केल्याने हा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करताना श्रीलंकेला अवघ्या २ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर ३ धावा घेत हा सामना जिंकला.

Live Updates

Asia Cup 2025 IND vs SL Highlights: आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. 

19:33 (IST) 26 Sep 2025
Sri Lanka vs India Asia Cup Live score: नाणेफक

आशिया चषकातील अखेरच्या सुपर फोर सामन्याची नाणेफेक श्रीलंकेने जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे. यासह भारतीय संघ प्रथम फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबेला विश्रांती देण्यात आली आहे.

18:58 (IST) 26 Sep 2025
IND vs SL Live: ICC ची हारिस रौफ-फरहानवर मोठी कारवाई, भारत-पाक फायनलपूर्वी बसला मोठा धक्का

Haris Rauf ICC Punishment: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफवर आयसीसीने कारवाई केली आहे. त्याने भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान आक्षेपार्ह हावभाव केले होते. …सविस्तर बातमी

18:40 (IST) 26 Sep 2025

India vs Sri Lanka Live Updates: ‘पॉवरप्ले’मध्ये फिरकीला मदत नाही -चक्रवर्ती

आशिया चषक स्पर्धेत ‘पॉवर-प्ले’च्या सहा षटकांदरम्यान फिरकीपटूंना फारशी मदत मिळत नाही, याबद्दल वरूण म्हणाला; ‘‘चेंडूचा टणकपणा कायम असतो, तेव्हा फिरकीपटूंना मदत मिळत नाही. तसेच ‘पॉवर-प्ले’ किंवा त्यानंतरची काही षटके खेळपट्टी व परिस्थिती फलंदाजीस अनुकूल असते. मात्र, सामना जसजसा पुढे जातो, तसतशी गोलंदाजांना मदत मिळण्यास सुरुवात होताना दिसते.”

17:52 (IST) 26 Sep 2025

भारताच्या ‘अ’ संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! राहुल-साईच्या शतकासह ऑस्ट्रेलिया अ संघावर मिळवला दणदणीत विजय; मालिकाही केली नावे

IND A vs AUS A: भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाविरूद्धची कसोटी मालिका आपल्या नावे केली आहे. संघाने दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. …वाचा सविस्तर
16:35 (IST) 26 Sep 2025

“भारताला हरवायचं असेल तर ‘या’ खेळाडूला…”, शोएब अख्तरचा पाकिस्तानला कानमंत्र; म्हणे, “त्यांचा दबदबा मोडून काढा”!

Shoaib Akhtar Message to Pakistan Team: आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यापूर्वी माजी पाक खेळाडू शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला काय मेसेज दिलाय, पाहा. …अधिक वाचा
16:11 (IST) 26 Sep 2025

PAK vs BAN: क्रिकेट की कॉमेडी? पाकिस्तानचं बांगलादेशविरूद्ध ‘गल्ली स्टाईल क्रिकेट’ सोशल मीडियावर Video व्हायरल

Funny Incident In PAK vs BAN Match: बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात मजेशीर घटना घडली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. …सविस्तर बातमी
15:12 (IST) 26 Sep 2025

Sri Lanka vs India Asia Cup Live score: भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सुपर फोरमधील औपचारिक सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आशिया चषकातील सामन्यांमध्ये ज्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळालेली नाही, ते खेळाडू हे सामना खेळू शकतात. बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते.

13:31 (IST) 26 Sep 2025

अंतिम सामन्यात पाकिस्तानचे पारडे जड? भारताविरोधात फायनलमध्ये पाकिस्तानचा अधिकवेळा विजय

India vs Pakistan: बांगलादेशचा ११ धावांनी पराभव केल्यानंतर भारताने आशिया चषक २०२५ स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. ४१ वर्षांनी भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यात समोरासमोर येत आहेत. …अधिक वाचा
13:07 (IST) 26 Sep 2025

Pakistan vs Bangladesh : बांगलादेश पाकिस्तान विरुद्ध का हरला? ५ कारणे…

Pakistan vs Bangladesh Highlights : पाकिस्तानचा विजय नेमका कशामुळे झाला? बांगलादेशी खेळाडूंना कोणकोणत्या चुका महागात पडल्या? सामन्याचे चित्र नेमके कुठे पालटले? त्याचाच हा आढावा… …अधिक वाचा
13:06 (IST) 26 Sep 2025

IND vs SL Head To Head Record: टी-२० क्रिकेटमध्ये कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ३१ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने २१ सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने ९ सामने जिंकले आहेत. यादरम्यान १ सामना अनिर्णित राहिला आहे.

13:02 (IST) 26 Sep 2025

IND-A vs AUS-A: ऑस्ट्रेलियाचा डाव फसला! केएल राहुल- साई सुदर्शनचं दमदार शतक; भारताकडे विजयाची संधी

India A vs Australia A: भारत अ विरूद्ध ऑस्ट्रलिया अ यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात केएल राहुल आणि साई सुदर्शनने दमदार शतक झळकावलं आहे. …सविस्तर वाचा
12:29 (IST) 26 Sep 2025

IND vs SL Playing 11: या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११?

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर -४ फेरीतील शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. (फोटो- जनसत्ता)