भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळल्या गेलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये खेळू न शकल्याने निराशा व्यक्त केली आहे. या मोठ्या स्पर्धेत आपले नाव न दिसल्याने खूप निराश झाल्याचे त्याने म्हटले आहे, पण यातून धडा घेतला आणि आपले क्रिकेट सुधारण्यासाठी सराव सुरूच ठेवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, अय्यरला टी२० विश्वचषक २०२२ साठी राखीव खेळाडू म्हणून नियुक्त करण्यात आले होते. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, अय्यरने कबूल केले की भारताच्या टी२० विश्वचषक २०२२ च्या संघात स्थान न मिळाल्याने तो निराश झाला होता. श्रेयसने नेहमी आपल्या देशाचे सर्वात मोठ्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले होते. पण ही संधी जरी मिळाली नसली तरी त्यामुळे तो खचून गेला नाही.

श्रेयस अय्यरने हिंदुस्तान टाईम्स सोबत बोलताना सांगितले की, “ विश्वचषकात निवड न होणे हे माझ्यासाठी निराशाजनक होते. सर्वात मोठ्या स्टेजवर आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे स्वप्न मी लहानपणीच पहिले होते. संघासाठी जिंकणे ही देखील एक गोष्ट आहे जी तुम्हाला थंडी देते. परिपूर्ण बनवते. पण मी पूर्णपणे खचलो असे झाले नाही. मी माझ्या मनात कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना किंवा विचार येऊ दिले नाही.”

हेही वाचा: IND vs SRI: ‘अरे थोडी तरी लाज…’  नो-बॉलच्या विक्रमी हॅटट्रिकनंतर अर्शदीप सिंगवर भडकले चाहते, सोशल मिडियावर मीम्सचा पूर

श्रेयस पुढे म्हणतो की, “मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत होतो. याकाळात मी विश्रांती घेतली आणि मागे जाऊन देशांतर्गत क्रिकेट खेळलो. यामुळे मला माझे कौशल्ये वाढवण्यासाठी अधिक वेळ मिळाला. दिवसाच्या शेवटी, तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून आणि पालकांकडून आदर मिळवायचा आहे. हे कायम लक्षात ठेवले पाहिजे कारण’ अशी एकाच गोष्ट आहे जी तुम्हाला एक खेळाडू म्हणून प्रेरित करते.”

दबावात खेळण्याबाबत श्रेयस म्हणतो, “दबावात असताना तुमच्याकडून सर्वोत्तम खेळी खेळण्यासाठी मदत होते आणि मला ते करायला आवडते. जेव्हा जेव्हा मला बरे वाटत नाही तेव्हा मी कुटुंब आणि मित्रांशी संवाद साधतो, माझे मन क्रिकेटपासून दूर राखण्याचा प्रयत्न करतो जेणेकरुन परत येताना मी मजबूतरित्या परत येऊ शकतो. या छोट्या पैलूंवर मी लक्ष केंद्रित करतो जे माझ्यासाठी खूप चांगले चालले आहे.”

शॉर्ट बॉल्सविरुद्धच्या त्याच्या संघर्षाबद्दल आणि त्यावर झालेल्या टीकेबद्दल बोलताना,  श्रेयस म्हणाला: “बाहेर चालणारी चर्चा मला प्रेरित करते, माझ्याकडून सर्वोत्तम खेळी व्हावी यासाठी मला मदतच होते. जितके लोक माझ्याबद्दल बोलतात तितके मी ते ऐकतो आणि दबावात चांगले काम करण्यासाठी प्रेरित होतो. मी स्वतःलाचं सांगतो की लोक जे बोलतात ते मला चुकीचे सिद्ध करायचे आहे.”

हेही वाचा: IND vs SL: “नो बॉल न टाकणे गोलंदाजाच्या ताब्यात असते…”, माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी अर्शदीपवर डागली तोफ

अय्यर म्हणाला, “जेव्हाही मी नेटमध्ये किंवा सामन्यात फलंदाजी करतो तेव्हा मी असाच विचार करतो. जेव्हा मी किलबिलाट करणाऱ्या विरोधकांविरुद्ध खेळत असतो, तेव्हा मला ती टीका चांगली खेळी करून परतवून लावायला आवडते. कारण मला वाटते की ते फक्त माझी लय बिघडवण्यासाठी केले जाते; मात्र मी त्यावर दुर्लक्ष करून पुढे जातो.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias middle order batsman shreyas iyer says hes not upset with bcci and team management after being dropped from t20 world cup avw